Home /News /national /

'उद्धव ठाकरेंनी अयोध्येला नाही तर मक्केला जावं'

'उद्धव ठाकरेंनी अयोध्येला नाही तर मक्केला जावं'

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्तेच्या हव्यासापोटी काँग्रेससोबत हातमिळवणी करीत राम भक्तांना धोका दिला आहे

    अयोध्या, 4 मार्च : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध केला जात आहे. अयोध्यातील तपस्वी छावणीचे महंत परमहंस दास यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधात राम भक्तांना धोका दिल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले, 'शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्तेच्या हव्यासापोटी काँग्रेससोबत हातमिळवणी करीत राम भक्तांना धोका दिला आहे. त्यांना अयोध्येत येऊ देणार नाही शिवाय त्यांना रामाचं दर्शनही घेऊ देणार नाही. मी स्वत: उद्धव ठाकरेंचा रस्ता रोखणार'. तपस्वी छावनीचे महंत परमहंस दास नाराज असून त्यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना मक्का येथे जाण्याचा सल्ला दिला आहे. उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत महंत म्हणाले, 'महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा अयोध्या दौरा राजकीय आहे. त्यामुळे त्यांनी अयोध्याऐवजी मक्का येथे जायला हवं. ते पुढे असंही म्हणाले, हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुस्तानाला हिंदू राष्ट्र बनविण्यासाठी शिवसेनेचं गठण केलं होतं. कारण जगात हिंदूचा स्वत:चा कोणताही देश नाही. बाळासाहेबांचं स्वप्न भारताला हिंदूराष्ट्र बनवायचं होतं'. हे वाचा - CMच्या कार्यक्रमात दीड वर्षांच्या बाळाला कडेवर घेऊन महिला कॉन्स्टेबल ड्यूटीवर उद्धव ठाकरेंकडून बाळासाहेबांचा अपमान परमहंस दास म्हणाले, 'बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं की आम्ही शिवसेनेला कधीच काँग्रेस होऊ देणार नाही. गरज पडली तर आम्ही निवडणुकही लढू. मात्र सत्तेचा हव्यासापोटी उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरेंचा अपमान केला आहे. त्यामुळे आता त्यांची अयोध्येत काही गरज नाही.  कोणत्याही परिस्थितीत मी उद्धव ठाकरेंना अयोध्येत प्रवेश करुन रामाचं दर्शन घेऊ देणार नाही'.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Aayodhya, Ayodhya ram mandir, Uudhav thackray

    पुढील बातम्या