रामाला त्याच्या जन्मस्थानी एक हक्काचे छप्पर देऊ शकत नाही? उद्धव ठाकरेंचा सवाल

रामाला त्याच्या जन्मस्थानी एक हक्काचे छप्पर देऊ शकत नाही? उद्धव ठाकरेंचा सवाल

मंदिर कसे होईल, कोणत्या मार्गाने होईल याचा निर्णय आता घेतला पाहिजे. - उद्धव ठाकरे

  • Share this:

मुंबई,18 जून : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राम मंदिरप्रश्नी आक्रमक भूमिका स्वीकारली आहे. या प्रकरणासंदर्भात त्यांनी आज सामना संपादकीयमधून आपली भूमिका मांडली आहे. 'जो रामाचा नाही तो कामाचा नाही असा निर्णय आता जनतेनेच दिला आहे. आमच्यासाठी राममंदिर हा राजकारणाचा नसून अस्मितेचा विषय आहे. कोर्टाचा निकाल लागायचा तो लागेल, पण संपूर्ण देश राममंदिराच्या बाजूने आहे. जनतेने लोकसभा निवडणुकीतून निकाल दिला आहे. 350 खासदारांचे बहुमत हाच राममंदिराचा जनादेश आहे. मंदिराच्या दिशेने सरकारनेच आता एक पाऊल पुढे टाकले पाहिजे. अयोध्येतील श्रीरामाचा वनवास संपवायला हवा. श्रीरामाने आम्हाला 350 खासदार दिले. सत्ता दिली. आम्ही त्याच्या जन्मस्थानी त्याला एक हक्काचे छप्पर देऊ शकत नाही?', असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

काय आहे आजचे सामना संपादकीय?

- ‘निवडणुकीनंतर सर्व विजयी खासदारांसह रामलल्लांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येऊ’ हा आमचा शब्द होता व ठरल्याप्रमाणे आम्ही आलो. खरे तर अयोध्यावासीयांचे म्हणा नाही तर रामलल्लांचे, पण आमचे ठरले आहे. आम्ही अयोध्येत येत राहू असे आमचे ठरले आहे. श्रीरामाच्या कृपेनेच भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेला भव्य यश लोकसभा निवडणुकीत मिळाले. हे यश फक्त अभूतपूर्वच नाही, तर विरोधकांना भुईसपाट करणारे आहे.

(पाहा : प्रेयसीला शिकवायचा होता धडा, सिद्धिविनायक मंदिर उडवण्याची दिली धमकी)

- ज्यांनी राममंदिरास विरोध केला ते नष्ट झाले. रामाच्या नावाने समुद्रात दगडही तरले. रामसेतू उभा राहिला. त्याच रामाच्या नावाने आजचे दिल्लीतील सरकारही तरले. प. बंगालात जाऊन अमित शहा यांनी ‘जय श्रीराम’चा नारा दिला आणि प्रभू श्रीरामाने कमाल केली. ममता बॅनर्जी यांना दुर्बुद्धी झाली. श्रीरामाचे नारे देणाऱ्यांना त्यांच्या सरकारने अपराधी ठरवले. त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला. ममता बॅनर्जींनी श्रीरामास विरोध केला म्हणून प. बंगालच्या हिंदुत्ववादी जनतेने भाजपचे 18 खासदार निवडून दिले. प. बंगालात भाजपची ताकद तोळामांसाचीच, पण रामविरोधकांना धडा शिकविण्यासाठीच बंगाली जनतेने विजयाचा रसगुल्ला भाजप तोंडी भरवला.

(पाहा : VIDEO : रोहितने पाक टीमला दिला सल्ला, म्हणाला...)

- आता वनवासातल्या रामास मुक्त करण्याची जबाबदारी कोणाची? ती शतप्रतिशत भाजप आणि शिवसेनेचीच आहे. नितीशकुमार व रामविलास पासवान यांनाही ‘सेक्युलर’वादाच्या नावाखाली राममंदिरापासून दूर पळता येणार नाही. त्यांच्या यशातही रामनामाचा वाटा आहेच. जो रामाचा नाही तो कामाचा नाही असा निर्णय आता जनतेनेच दिला आहे.

- कोर्टाचा निकाल लागायचा तो लागेल, पण संपूर्ण देश राममंदिराच्या बाजूने आहे. जनतेने लोकसभा निवडणुकीतून निकाल दिला आहे. राममंदिराबाबत सर्वोच्च न्यायालय काय तो निर्णय देईल ते नंतर पाहू. कायद्याच्या चौकटीत राहून राममंदिराचा प्रश्न सोडवू, असे पंतप्रधान मोदी सांगतात.

(पाहा : SPECIAL REPORT : माणुसकी मेली का हो! चिमुकल्यासोबत असं करण्याची हिंमत कशी होते?)

- मंदिर कसे होईल, कोणत्या मार्गाने होईल याचा निर्णय आता घेतला पाहिजे. भाजपचे उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य हे आमच्या आधी एक दिवस अयोध्येत होते. रामजन्मभूमी न्यासाचे प्रमुख संत नृत्य गोपालदास महाराजांच्या जन्मउत्सवात अयोध्येतील सर्व साधुसंतांच्या उपस्थितीत केशव प्रसाद यांनी सांगितले, ‘‘रामजन्मभूमीवर मंदिर बांधण्याचे दोनच पर्याय आहेत. मुस्लिम पक्षकारांशी चर्चा अथवा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश. हे दोन्ही पर्याय विफल झाले तर अध्यादेश काढून कायदा बनवून राममंदिराचे निर्माण व्हावे!’’ यावर जमलेल्या सर्व साधुसंतांनी विजयाचा शंखनाद केला.

SPECIAL REPORT: FACEBOOK LIVE दोन भावांच्या जीवावर बेतलं, अपघाताने नागपूर हादरलं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 18, 2019 06:44 AM IST

ताज्या बातम्या