शिवसेनेत व्हिपवर वाद, थोड्याच वेळात होऊ शकते उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद...!

शिवसेनेत व्हिपवर वाद, थोड्याच वेळात होऊ शकते उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद...!

थोड्याच वेळात शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे.

  • Share this:

20 जुलै : सध्या लोकसभेमध्ये भाजप विरोधातल्या अविश्वास ठरावावर चर्चा सुरू आहे. पण यात शिवसेना अनुपस्थित आहे. तर थोड्याच वेळात शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. कारण काल शिवसेनेनं नरेंद्र मोदी सरकारविरूद्धच्या अविश्वास प्रस्तावावर सरकारच्या बाजून उभं राहण्याचा निर्णय घेतला होता. तसा व्हिपच सर्व खासदारांसाठी जारी केला होता. त्याचबरोबर सर्वांना संसदेत उपस्थित राहण्याचं फर्मानही सोडण्यात आलं होतं.

शिवसेनेचे लोकसभेतले मुख्य प्रतोद चंद्रकांत खैरे यांनी व्हिप काढून सरकारला समर्थन देण्यास सर्व खासदारांना सांगितलं होतं. 19 आणि 20 जुलैला अतिमहत्वाचं कामकाज संसदेत असल्याने सर्व खासदारांनी उपस्थित राहावं असं या व्हिपमध्ये म्हटलं होतं. पण काल कोणताही निर्णय झाला नसताना शिसवेनेकडून व्हीप कसा जारी झाला. असा प्रश्न आता उपस्थित होतो. दरम्यान या सगळ्यामुळे शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. त्यामुळे काहीही चर्चा नसताना व्हिप जारी झालाच कसा आणि तो कोणी केला यावर आता उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेणार आहे. त्यामुळे त्यांच्या या परिषदेकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, या चर्चेला सुरूवात होण्याआधी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी खासदारांसोबत बैठक घेतली. उद्धव ठाकरेंच्या सांगण्यानुसार, शिवसेना लोकसभेत अनुपस्थित राहणार असल्याचं त्यांनी या बैठकीत सांगितलं. त्यांनी त्यांच्या सर्व खासदारांना सभागृहातच थांबण्याचे आदेश दिले. त्यामुळे लोकसभेत चर्चेला सुरूवात झाली पण यात शिवसेना अनुपस्थित आहे.

No Confidence Motion : राहुल गांधींच्या भाषणापूर्वी काँग्रेसचा मोदींवर ट्विटर हल्ला

शिवसेना बीजेडीने लोकसभेतील अविश्वास ठरावावर बहिष्कार घातल्याने भाजप मोदी सरकारचा मार्ग अधिकच सुकर झाला आहे.... काय संख्याबळ बदललं आकडेवारी काय सांगतेय पाहुयात...

- लोकसभेत एकूण 544 जागा आहेत.

- 10 जागा रिक्त असल्याने सध्या सभागृहात 534 आहे

- शिवसेना (18) आणि बीजेडी (20) बहिष्कार घातल्याने आता अविश्वास ठराव वेळी लोकसभेतील संख्याबळ झाले आहे 496.

- बहुमतासाठी आता 268 ऐवजी 249 इतकं संख्याबळ आवश्यक आहे.

- भाजपकडे स्वतःच्या 270 सदस्य असल्याने ते स्पष्ट बहुमत ठेवून आहेत.

- भाजपला एनडीएचे घटक पक्ष असलेल्या लोकजनशक्ती (६), राष्ट्रीय लोकसमता आघाडी (३), शिरोमणी अकाली दल (४), अपना दल (२),जदयु (2), ए आर काँग्रेस (1) आदी पक्षांचा पाठिंबा मिळालाय आणि सभागृहात मतदान झालंच तर भाजप आणि  एनडीए घटकपक्ष मिळून अंदाजे 300च्या वर भाजपचे संख्याबळ जाते.

- अविश्वास ठराव दाखल करणा-या टिडीपी कडे (१७), काँग्रेस (४८), तृणमुल काँग्रेस (३४), आयएसआर (८), डाव्यांकडे (९) आणि इतरही भाजपा विरोधी पक्ष आघाडीचा विचार केला तर युपीएकडे एकुण अवघ्या 120 इतकं संख्याबळ आहे.

- त्यामुळं मोदी सरकारला धोका नाहीये.

- अर्थात या अविश्वास ठरावाद्वारे मोदी सरकार लोकसभा निवडणुकीला सामोरं जाण्यापुर्वी सभागृहात पुन्हा एकदा एनडीएचं शक्तीप्रदर्शन करुन विरोधी आघाडीला नामोहरण करेल.

- आण्णा द्रमुक (37) नेही भाजप विरोधात मतदान केलं नाही तर मोदी विरोधकांची हवाच निघून जाईल.

हेही वाचा...

लोकसभेतील अविश्वास ठरावाच्या चर्चेआधी मोदींनी केलं 'हे' ट्विट

अविश्वास प्रस्तावावर राहुल गांधींना घेरण्याचा भाजपचा डाव

First published: July 20, 2018, 12:04 PM IST

ताज्या बातम्या