बाळासाहेबांचे पुत्र उद्धव ठाकरे भाजपला धडा शिकवणार- माजी पंतप्रधान

बाळासाहेबांचे पुत्र उद्धव ठाकरे भाजपला धडा शिकवणार- माजी पंतप्रधान

शिवसेनेला पाठिंबा द्यावा की नाही यावर काँग्रेसला माजी पंतप्रधानांनी दिला सल्ला...

  • Share this:

बेंगळुरू, 11 नोव्हेंबर: महाराष्ट्रात शिवसेनेला पाठिंबा द्यावा की नाही यावर काँग्रेसचा विचार सुरु आहे. राज्यातील काँग्रेस आमदारांनी शिवसेनेला पाठिंबा द्यावा असे मत व्यक्त केले आहे. तर दिल्लीतील सूत्रांकडून आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी शिवसेनेला पाठिंबा देण्यास विरोध केला आहे. शिवसेनेला पाठिंबा द्यावा की नको याबाबत काँग्रेस पेचात सापडली असताना त्यांच्या मदतीला माजी पंतप्रधान आले आहेत.

जर काँग्रेस शिवसेनेला सरकार स्थापन करण्यासाठी पाठिंबा देणार असेल तर त्यांनी राज्य सरकार पुढील पाच वर्षासाठी स्थिर राहील याची हमी द्यावी. तरच लोक काँग्रेसवर विश्वास ठेवतील, असा सल्ला माजी पंतप्रधान एच.डी देवेगौडा यांनी दिला आहे.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी भाजपला महाराष्ट्रात स्थान दिले. लालकृष्ण अडवाणी आणि अटलबिहारी वाजपेयी स्वत: बाळासाहेबांकडे केले होते. त्यांनी बाळासाहेबांकडे जागेची मागणी केली होती. आता भाजपने मर्यादा ओलांडली आहे. बाळासाहेबांचे पुत्र उद्धव ठाकरे यांनी आता भूमिका घेतली आहे आणि ते भाजपला धडा शिकवतील. काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे भाजपला खाली खेचण्याची संधी आहे, असे देवेगौडा म्हणाले.

विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन दोन आठवडे झाले तरी अद्याप राज्यातील सत्ता स्थापनेचा पेच सुटलेला नाही. शिवसेना आणि भाजप यांच्यातील युती तुटल्यानंतर आता सेनेने सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. पण त्यासाठी त्यांना राष्ट्रवादी आणि काँग्रेसची गरज आहे. राष्ट्रवादीने पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र काँग्रेस जो निर्णय घेणार त्यावर राष्ट्रवादीचा निर्णय अवलंबून आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 11, 2019 04:53 PM IST

ताज्या बातम्या