S M L

उद्धव ठाकरे-नरेंद्र मोदींची भेट, शेतकरी कर्जमाफीवर चर्चा

ग्रामीण स्तरावर काम करण्यासाठी सगळ्यांना एकत्र घ्यावं असं आवाहन उद्धव यांनी केलं

Sachin Salve | Updated On: Apr 11, 2017 12:09 AM IST

उद्धव ठाकरे-नरेंद्र मोदींची भेट, शेतकरी कर्जमाफीवर चर्चा

10 एप्रिल : एनडीएच्या बैठकीत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अखेर भेट झाली. दोन्ही नेत्यांमध्ये 15 मिनिटं चर्चा झाली या चर्चेत शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी मोदींकडे केली.

राष्ट्रपती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप अध्यक्ष अमित शहांनी मित्रपक्षांसाठी दिल्लीत जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला. त्याआधी पंतप्रधान मोदी यांनी एनडीएच्या सर्व घटकपक्षांची बैठक घेतली. तब्बल 5 तास ही मॅरेथान बैठक सुरू होती. पण सगळ्याचं लक्ष लागलं होतं ते मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीकडे. अखेर या दोन्ही नेत्यांनी भेट झाली. दोन्ही नेत्यांमध्ये 15 मिनिट चर्चा झाली.

ग्रामीण स्तरावर काम करण्यासाठी सगळ्यांना एकत्र घ्यावं असं आवाहन उद्धव यांनी मोदींकडे केलं. तसंच उत्तरप्रदेशमध्ये ज्या प्रमाणे शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली त्याप्रमाणे  महाराष्ट्रातही शेतकऱ्यांचे कर्जमाफ करावे अशीही मागणी उद्धव यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 11, 2017 12:09 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close