...शरद पवारांनी पाणी-शेतीबाबत कायमस्वरूपी कोणत्या योजना राबवल्या?-उद्धव ठाकरे

...शरद पवारांनी पाणी-शेतीबाबत कायमस्वरूपी कोणत्या योजना राबवल्या?-उद्धव ठाकरे

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि त्यावरून सुरू असलेल्या राजकारणावर भाष्य केलं आहे.

  • Share this:

मुंबई, 7 मे : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि त्यावरून सुरू असलेल्या राजकारणावर भाष्य केलं आहे. विरोधक दुष्काळाचे राजकारण करू पाहत, असा आरोपही त्यांनी केला आहे. ''महाराष्ट्रावर कोसळलेले दुष्काळाचे संकट गंभीरच आहे. मात्र त्यावरून राजकीय पोळ्या भाजणे योग्य नाही. उलट दुष्काळाच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी एकत्र येऊन दोन हात केले पाहिजेत. सरकार तर काम करते आहेच, पण विरोधी पक्ष, दानशूर लोक आणि स्वयंसेवी संस्था या सगळ्यांनीच सरकारच्या खांद्याला खांदा लावून दुष्काळग्रस्तांचे अश्रू पुसले पाहिजेत. प्रसंग बाका आहे. त्यामुळे टीका करण्यापेक्षा दुष्काळग्रस्त भागात आपण काय काम करू शकतो याचा विचार प्रत्येकानेच करायला हवा!'', अशा शब्दांत त्यांनी दुष्काळावर राजकारण न करण्याचं आवाहन केलं आहे.

दरम्यान, राज्यातील मतदान प्रक्रिया उरकल्यानंतर आता सर्वच राजकीय नेत्यांना दुष्काळी परिस्थितीची आठवण झाल्याचं पाहायला मिळत आहे.

वाचा :SPECIAL REPORT : 'वंचित फॅक्टर'मुळे अशोक चव्हाणांच्या गडाला सुरुंग?

काय आहे आजचे सामना संपादकीय?

- महाराष्ट्रातील यावेळचा दुष्काळ भीषण आहे. निवडणुकांचा सुकाळ संपला आहे. त्यामुळे आता दुष्काळ निवारणाच्या कामात झोकून देणे गरजेचे आहे. भीषण दुष्काळाची स्थिती लक्षात घेता आचारसंहिता शिथिल करण्याची मागणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी निवडणूक आयुक्तांकडे केली व निवडणूक आयुक्तांनी ही मागणी उदार मनाने मान्य केली.

- शेवटचे मतदान संपताच शरद पवार यांनी राज्यभरात दुष्काळी दौरे सुरू केले. दुष्काळ निवारणासाठी सरकार काहीच करीत नसल्याचा आरोप त्यांनी केला. सरकारने काहीही व कितीही केले तरी विरोधकांना ते प्रयत्न कमीच वाटतात. त्यामुळे दुष्काळप्रश्नी विरोधक काय म्हणतात याकडे सरकारने दुर्लक्ष केले पाहिजे. दुष्काळी दौरे हे विधानसभा निवडणुकांच्या तयारीचे दौरे म्हणून चालले असतील तर ते चुकीचे आहे.

- श्री. पवारांकडून दुष्काळाचे राजकारण केले जात असल्याची चिंता महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली. दुष्काळाचे राजकारण करण्यापेक्षा दुष्काळ निवारणाच्या कामात सरकारच्या खांद्याला खांदा लावून काम करा असे पाटलांनी विरोधकांना ठणकावले ते योग्यच आहे.

वाचा :VIDEO : 'सामना'तील 'त्या' अग्रलेखाबद्दल संजय राऊत बॅकफूटवर, म्हणाले...

- महाराष्ट्रावर पुन्हा एकदा 2016 सारखी पाण्याची अभूतपूर्व टंचाई निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भाची तर अक्षरशः होरपळ सुरू आहे.

- दुष्काळाची दाहकता तर आहेच, पण परिस्थितीचे गांभीर्य राज्य सरकारला नाही हा विरोधकांचा आरोप राजकीय आहे. शरद पवार यांना शेती, पाणी, दुष्काळ यातील ज्ञान चांगले आहे. अनेक वर्षे त्यांच्याही हातात केंद्राची तसेच राज्याची सत्ता होती. मग पाणी व शेती याबाबत त्यांनी कायमस्वरूपी कोणत्या योजना राबविल्या?

वाचा :SPECIAL REPORT : अमेठीत रुग्णालयावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये राडा

- जलयुक्त शिवाराची योजना सध्याच्या सत्ताधाऱ्यांनी राबविली आहे, पण आधीच्या सरकारात सगळ्यात मोठा घोटाळा जलसिंचनाच्या योजनांत झाला आहे हे पुराव्यानिशी समोर आले. पवारांनी अशी मागणी केली आहे की, दुष्काळी भागातील जनतेला पिण्याचे पाणी आणि रोजगार तातडीने द्यावा, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे कर्ज तातडीने माफ करावे, पीक कर्जासह अन्य कर्जांची वसुली तत्काळ थांबवावी, यंदाच्या दुष्काळात फळबागांचे नुकसान मोठे आहे, त्यांना मदत करावी.

- दुष्काळग्रस्त गावांमध्ये जमीन महसूल करात सूट, पीक कर्जाचे पुनर्गठन, शेती पंपाच्या वीज बिलात 33.5 टक्के सूट, विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात माफी अशा अनेक बाबी सरकारने आधीच केल्या आहेत.

- दुष्काळाचा सर्वाधिक फटका बसलेल्या गावांना भेटी देऊन तेथील चारा-पाण्याच्या टंचाईची माहिती घेऊन तातडीने उपाययोजना करण्याविषयी अधिकाऱ्यांना सूचना देण्याचे काम पालकमंत्री करीत आहेत.

VIDEO :...तर त्यात वावगं काय? प्रिया बापट भडकली ट्रोलकऱ्यांवर!

First published: May 7, 2019, 6:38 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading