कलंक मिटला! कलम 370 हा देशाशी केलेला विश्वासघात होता-उद्धव ठाकरे

Article 370 : जम्मू काश्मीरमधील कलम 370 रद्द केल्याबाबत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारचं तोंडभरून कौतुक केलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 6, 2019 07:11 AM IST

कलंक मिटला! कलम 370 हा देशाशी केलेला विश्वासघात होता-उद्धव ठाकरे

नवी दिल्ली, 6 ऑगस्ट : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारनं ऐतिहासिक निर्णय घेत जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम 370 मंगळवारी (5 ऑगस्ट) रद्द केलं. यामुळे जम्मू काश्मीरचा भूगोल बदलणार आहे. या निर्णयानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारचं तोंडभरून कौतुक केलं आहे. उद्धव ठाकरे म्हणाले आहेत की, '370 कलम रद्द करण्याचा निर्णय घेऊन 70 वर्षांपासून हिंदुस्थानच्या माथ्यावर लागलेला कलंक सरकारनं नष्ट केला. काश्मीरचे खऱ्या अर्थानं आता हिंदुस्थानात विलीनीकरण झाले आहे. 9 ऑगस्टचा क्रांतिदिन, 15 ऑगस्टचा स्वातंत्र्य दिन आणि आता काश्मीरला मोकळा श्वास देणाऱ्या 5 ऑगस्टच्या ऐतिहासिक दिनानं ऑगस्ट महिन्याचे पावित्र्य आणखी वाढवले आहे. देशद्रोह्याच्या छाताडावर बसून बजावलेल्या या धाडसी, साहसी, अद्भुत आणि अचाट कामगिरीबद्दल शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, दीनदयालल उपाध्याय, श्यामाप्रसाद मुखर्जी आणि  अटलबिहारी वाजपेयीदेखील स्वर्गातून आज या सरकारवर नक्कीच पुष्पवृष्टी करत असतील'.

(वाचा : Article 370 : कायम जहरी टीका करणाऱ्या राज ठाकरेंनी केलं मोदी सरकारचं कौतुक)

काय आहे आजचे सामना संपादकीय?

- देशद्रोह्यांच्या धमक्यांना भीक न घालता जम्मू काश्मीरचे फाजील लाड करणारे घटनेतील 370 हे वादग्रस्त कलम सरकारनं मुळासकट उखडून फेकून दिलं आहे. कलम 370 हा देशाशी केलेला विश्वासघात होता. हिंदुस्थानचे स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्वावर लागलेला कलंक होता. तो कलंज आज नष्ट झाला आहे.

(वाचा :काश्मीर प्रश्नावर शाहीद आफ्रिदीने तोडले अकलेचे तारे)

Loading...

- या 370 कलमाच्या सैतानामुळेच जम्मू-काश्मीर हिंदुस्थानच्या मुख्य प्रवाहामुळे तुलटे होते.

- मागील काही दशकांमध्ये जो दहशतवाद फोफावला त्याचे मूळ 370 आणि 35 अ या कलमांमध्येच दडले होते. त्या मुळावरच सरकारने घाला घातला.

- कलम 370च्या भस्मासुरामुळेच एकाच देशात दोन निशाण, दोन विधान आणि दोन पंतप्रधान करण्याची नामुष्की हिंदुस्थानावर ओढावली होती.

(वाचा :Article 370 चा मसुदा करायला डॉ. आंबेडकरांनी दिला होता नकार)

- 70 वर्षांपूर्वी झालेली चूक दुरुस्त करण्याचं महान कार्य मोदी सरकारनं संसदेत पार पाडलं. या साहसी कामगिरीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे अभिनंदन करण्यासाठी आज शब्दही थिटे पडत आहेत.

- 370 कलम रद्द करण्याचे आश्वासन शिवसेना-भाजप युतीनं लोकसभा निवडणुकीत दिले होते, ते आज पूर्ण झाले.

70 वर्षांची भळभळती जखम अखेर भरली, मोदी-शहांनी फत्ते केलं 'मिशन जम्मू-काश्मीर'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 6, 2019 06:59 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...