Triple Talaq Bill: मुल्लांचा स्वतंत्र कायदा चालणार नाही,मोदी सरकारने तेच दाखवून दिलं-उद्धव ठाकरे

तलाकच्या कुप्रथेला सरकारने कायद्यानेच वेसण घातली हे चांगलेच झाले. भगवान के घर देर है, लेकीन अंधेर नहीं हैं। स्वातंत्र्यानंतर सत्तर वर्षांनी हा अंधकार दूर झाला. मोदी सरकारने हे पुण्याचे काम केले. त्यांचे अभिनंदन! - उद्धव ठाकरे

News18 Lokmat | Updated On: Aug 1, 2019 07:01 AM IST

Triple Talaq Bill: मुल्लांचा स्वतंत्र कायदा चालणार नाही,मोदी सरकारने तेच दाखवून दिलं-उद्धव ठाकरे

मुंबई, 1 ऑगस्ट : मोदी सरकारला अखेर तिहेरी तलाकबंदीचा कायदा संसदेकडून मंजूर करून घेण्यात मंगळवारी ( 30 जुलै) यश आलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावरून मोदी सरकारचे कौतुक करत काँग्रेसवर ताशेरे ओढले आहेत. भगवान के घर देर है, लेकीन अंधेर नहीं हैं। स्वातंत्र्यानंतर सत्तर वर्षांनी हा अंधकार दूर झाला ,असे त्यांनी सामना संपादकीयमध्ये म्हटलं आहे.

''तीन तलाकच्या शिकार होणाऱ्या 80 टक्के महिला गरीब घराण्यातल्या आहेत व त्यांचा आवाज घशातच दाबला जात होता. या सगळ्या महिलांना स्वातंत्र्य मिळवून देण्याचे काम मोदी सरकारने केले. तिहेरी तलाकविरोधी कायदा मंजूर होताच मुस्लिम महिला देशभरात रस्त्यावर उतरून आनंद साजरा करीत होत्या. मुस्लिम महिलांना उशिरा का होईना न्याय मिळाला आहे. तलाकच्या कुप्रथेला सरकारने कायद्यानेच वेसण घातली हे चांगलेच झाले. भगवान के घर देर है, लेकीन अंधेर नहीं हैं। स्वातंत्र्यानंतर सत्तर वर्षांनी हा अंधकार दूर झाला. मोदी सरकारने हे पुण्याचे काम केले. त्यांचे अभिनंदन!'',अशा शब्दांत त्यांनी मोदी सरकारचं कौतुक केलं आहे.

काय आहे आजचे सामना संपादकीय?

- हिंदुस्थानातील बारा कोटी मुस्लिम महिला आता मोकळा श्वास घेऊ शकतील. तिहेरी तलाकच्या गुलामीच्या बेड्यांतून त्या मुक्त झाल्या आहेत. एक नवी आशा, नवे जीवन घेऊन या कोटय़वधी महिला यापुढे जगतील. मोदींचे सरकार त्याबद्दल अभिनंदनास पात्र आहे. काँग्रेससह काही बेगडी निधर्मीवाद्यांनी शेवटपर्यंत ‘तिहेरी तलाकविरोधी कायदा’ मंजूर होऊ नये यासाठी आटापिटा केला. हा कायदा मंजूर झाला तर देशातील निधर्मीवाद धोक्यात येईल अशी पिचकारी मारली. त्याचा काहीएक उपयोग झाला नाही.

(पाहा :VIDEO : आणखी आमदार संपर्कात, पण गिरीश महाजनांनी व्यक्त केली ही शंका)

Loading...

- मुस्लिम समाजातील एका रानटी प्रथेला मोदी सरकारने कचऱ्याच्या टोपलीत फेकून दिले आहे. एका दीर्घकालीन अन्याय पर्वाची दुरुस्ती झाली आहे. मुस्लिमांचे स्वयंभू मसीहा मियां ओवेसी यांनी थयथयाट करीत सांगितले, ‘‘तिहेरी तलाक’ ही तर अल्लाची देन आहे.’’ ओवेसींसारखे लोक अल्लाच्या नावाखाली संपूर्ण मुस्लिम समाजाला मूर्ख बनवीत आहेत. कोणत्या अल्लाची बात मियां ओवेसी करीत आहेत? ही अल्लाची देन नसून मुल्लांची देन आहे. देशात यापुढे हिंदू-मुसलमानांसाठी एकच कायदा चालेल. मुल्लांचा स्वतंत्र कायदा चालणार नाही.

(पाहा : VIDEO: मी गद्दार नाही, भाजप प्रवेशानंतर चित्रा वाघ भावुक!)

- मियां ओवेसी म्हणतात, ‘‘इस्लाममध्ये लग्न हा एक करार आहे, कॉन्ट्रक्ट आहे. करार मोडण्याचा अधिकार नवऱ्याला आहे.’’ म्हणजे नवऱ्याची मर्जी आहे तोपर्यंत बायको म्हणून स्त्रीचा उपभोग घ्यायचा. मर्जी संपली की, ‘तलाक – तलाक – तलाक’ असे म्हणून करार मोडून टाकायचा. पुन्हा आता तर  हा तोंडी तलाक फोनवर, व्हॉटस्ऍपवर देण्यापर्यंत मुसलमान पुरुषांची मजल गेली आहे. मात्र आता नवीन कायद्याने या पद्धतीने तोंडी तलाक देणाऱ्या नवऱ्यांना तीन वर्षांची सजा आणि दंडाचा दणका दिला आहे. त्यामुळे ‘हम पाच और हमारे पच्चीस’ या मस्तवाल कल्पनेस आळा बसणार आहे. हे सर्व आता हिंदुस्थानी कायद्याने होईल.

(पाहा :VIDEO : ममतादीदींची भेट घेतल्यानंतर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया)

- मर्जीप्रमाणे लग्न करायचे व अल्लाच्या मर्जीने बायकोपोरांना बेसहारा करून दुसरे लग्न करायचे हे आता कायद्याने बंद झाले. दहा कोटी मुस्लिम महिलांचा हा विजय आहे. शहाबानो प्रकरणात राजीव गांधींच्या काँग्रेस सरकारला हे सहज करता आले असते, पण त्यांनी कच खाल्ली. शहाबानो प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय असतानाही राजीव गांधी यांनी मुस्लिमांच्या ‘शरीयत’पुढे गुडघे टेकले व घटनेचा अपमान केला. हे सर्व मुस्लिम व्होट बँकेच्या

दाढय़ा कुरवाळण्यासाठी झाले.

- काँग्रेसने न्याय केला नाही, हिंदू आणि मुसलमान अशी दरी मिटवली नाही. त्या दरीतच ते आता कोसळले आहेत.

- हे सर्व काँग्रेसच्या नशिबी आले असते, पण 1985 सालात लोकसभेत 400 जागा जिंकूनही त्यांनी मुस्लिम महिलांना न्याय दिला नाही. तेव्हापासून काँग्रेसला कधीच बहुमत मिळाले नाही व काँग्रेसची घसरण सुरू झाली. ती अजून सुरूच आहे.

VIDEO :..तेव्हा शिवसेना कशी फोडली? चंद्रकांत पाटलांचं पवारांना जशास तसे उत्तर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 1, 2019 07:01 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...