उकळत्या सांबरच्या भांड्यात पडून 2 वर्षांच्या चिमुरडीचा करूण अंत

उकळत्या सांबरच्या भांड्यात पडून 2 वर्षांच्या चिमुरडीचा करूण अंत

या चिमुरडीचे आई-वडील हे शाळेतच पार्ट टाईम म्हणून काम करत होते. या घटनेनं परिसरात शोककळा पसरली

  • Share this:

तेलंगाणा, 19 डिसेंबर : उकळत्या सांबरमध्ये पडून एका 2 वर्षांच्या चिमुरडीचा करूण अंत झाल्याची ह्रदयद्रावक घटना तेलंगाणा इथं घडली आहे.

पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार, आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. सकाळच्या सत्रात शाळेत विद्यार्थ्यांसाठी मध्यान्य भोजनाची व्यवस्था लावली जात होती. त्यावेळी जवळच एक 2 वर्षांची चिमुरडी खेळत होती. अचानक तीचा बेंचवरून तोल गेला आणि ती उकळत्या सांबरच्या मोठ्या भांड्यात पडली.

तिथे उपस्थितीत असलेल्या शिक्षकांनी आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने कुरनूल येथील रुग्णालयात दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर मृत घोषित केले. या चिमुरडीचे आई-वडील हे शाळेतच पार्ट टाईम म्हणून काम करत होते. या घटनेनं परिसरात शोककळा पसरली असून चिमुरडीच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

'नकोशी' झाली 'हवीशी', दत्तक घेण्यासाठी अनेक दाम्पत्य सरसावले

दरम्यान, पुण्यातील एका घटनेनं सर्वांचं मन सुन्न केलं आहे. पुण्यातील विश्रांतवाडीत बुधवारी एका नवजात बाळाला अशरशः कचरा कुंडीत फेकून देण्यात आलं होतं. पण केवळ कचरावेचक महिलेच्या प्रसंगावधनामुळे या चिमुकलीचा जीव थोडक्यात वाचला. या बेवारस नकोशीला दत्तक घेण्यासाठी आता अनेक दाम्पत्य सरसावले आहेत. पुण्यातील स्नेहगंध सोसायटीत बुधवारी लक्ष्मी डेबरे या कचरावेचक महिलेला हे नवजात बाळ कचरा कुंडीत सापडलं होतं. या बाळाच्या आईला ही चिमुकली कदाचित नकोशी झाली असावी, म्हणूनच तिचा जन्म होताच तिला एका उशीच्या खोळीत रक्ताळलेल्या नाळासह गुंडाळून फेकून देण्यात आलं होतं. पण या चिमुकलीचं नशीब बलवत्तर म्हणून लक्ष्मी डेबरे यांच्या दृष्टीस ती पडली आणि या चिमुलकीचा जीव थोडक्यात वाचला. लक्ष्मी डेबरे यांनी तत्काळ याबाबत पोलिसांना माहिती दिली. चिमुकलीची प्रकृती उत्तम असून विश्रातवाडी पोलिसांनी तिला अरुणाश्रमाकडे सुपूर्त करण्यात आले आहे. जेणेकरून तिचं संगोपण होऊ शकेल.

दत्तक घेण्यासाठी अनेक दाम्पत्य सरसावले...

आनंदाची बाब म्हणजे चिमुकलीला दत्तक घेण्यासाठी अनेक दाम्पत्य सरसावले आहेत. त्यात डॉक्टर दाम्पत्याचा समावेश आहे. अशी माहिती विश्रांतवाडी पोलिस स्टेशनचे एपीआय संदीप यादव यांनी दिली आहे. या घटनेतील दुर्दैवाची बाब म्हणजे ज्या स्नेहगंध सोसायटीत ही नवजात नकोशी आढळून आली त्या सोसायटीचे लोक या संवदेनशील बोलायला देखील तयार नाहीत. याउलट ज्या कचरावेचक लक्ष्मीने तिचा जीव वाचवला. त्या स्वच्छता संस्थेच्या सर्व महिलांनी मोठ्या आस्थेने या चिमुकलीची काळजी घेतली. तिला व्यवस्थितपणे पोलिसांमार्फत रुग्णालयात देखील पोहोवलं. म्हणतात ना, मायेच्या ममतेला कुठल्याही रक्ताच्या नात्याची गरज लागत नाही. हेच खरं..

Published by: sachin Salve
First published: December 19, 2019, 11:34 PM IST
Tags: girl

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading