Home /News /national /

चालत्या ट्रेनच्या खिडकीतून पडूनही बचावली 2 वर्षांची चिमुरडी, RPF टीम ठरली देवदूत

चालत्या ट्रेनच्या खिडकीतून पडूनही बचावली 2 वर्षांची चिमुरडी, RPF टीम ठरली देवदूत

'काळ आला होता पण वेळ आली नव्हती' ही म्हण आपण बऱ्याचदा ऐकली आहे. अशीच काहीशी घटना एका दोन वर्षाच्या चिमुरडीसोबत घडली आहे. ट्रेनच्या खिडकीतून ही दोन वर्षाची मुलगी बाहेर पडली (two year old baby fall from running train) आणि आरपीएफ जवानामुळे तिचा जीव वाचला आहे.

पुढे वाचा ...
  नवसारी, 24 मार्च: 'काळ आला होता पण वेळ आली नव्हती' ही म्हण आपण बऱ्याचदा ऐकली आहे. अशीच काहीशी घटना एका दोन वर्षाच्या चिमुरडीसोबत घडली आहे. ट्रेनच्या खिडकीतून ही दोन वर्षाची मुलगी बाहेर पडली (two year old baby fall from running train) आणि आरपीएफ जवानामुळे तिचा जीव वाचला आहे. रात्रीच्या ट्रेनमधून पडलेल्या दोन वर्षाच्या चिमुरडीचा जीव एका आरपीएफ जवानने वाचवला आहे. भिलाड याठिकाणचे असणारे हे कुटुंब मुंबईहून मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) जाणाऱ्या अवंतिका एक्स्प्रेसमध्ये चढले. कुटुंबात दोन वर्षाची मुलगी होती. रात्री चालत्या गाडीतून दोन वर्षांची रुही रेल्वेच्या आपत्कालीन विंडोमधून खाली पडली होती. मुलीला रेल्वे रुळावर आरपीएफने पाहिले, वेळेत सहाय्य केल्यामुळे ही मुलगी ट्रॅकवर पडूनही वाचली आहे. या दुर्घटनेमध्ये ही चिमुरडी जखमी झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महेश हेन्चा (Mahesh Hencha) हे वलसाडमधील भिलाडहून त्याची दोन वर्षांची मुलगी रुही, हिच्यासह मध्य प्रदेशातील देवास याठिकाणी निघाले होते. महेशसोबत त्याची दोन वर्षांची मुलगी रुही होती. दरम्यान रुही आपत्कालीन खिडकीतून खाली पडली. कुटुंबाला घटला प्रकार लक्षात येताच त्यांनी ट्रेनची साखळी खेचली. नंतर गाडी अमळसड स्थानकावर थांबली. या घटनेची माहिती नंतर अमळसड स्टेशन मास्तरांना देण्यात आली. रुहीला सध्या तिच्या कुटुंबीयांबरोबर असून तिची तब्येत सुधारते आहे
  रुहीला सध्या तिच्या कुटुंबीयांबरोबर असून तिची तब्येत सुधारते आहे
  अमळसड स्टेशन मास्तरांनी तातडीने या मुलीचा शोध घेण्यासाठी बिलीमोरा रेल्वे पोलिसांना कळविले. नंतर, वलसाड पोलिसांचा डी स्टाफ आणि आरपीएफ जवान शैलेश पटेल या मुलीच्या शोधात होते. मुलगी ट्रेनमधून खाली पडल्यामुळे सगळेजण रुळावरुन चालून तिचा शोध घेत होते. मध्यरात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला होता. शैलेश पटेल आणि त्यांच्या टीमने रूहीला शोधून तिला रुग्णालयात भरती केलं, त्यामुळे त्या चिमुरडीचे प्राण वाचले आहेत
  शैलेश पटेल आणि त्यांच्या टीमने रूहीला शोधून तिला रुग्णालयात भरती केलं, त्यामुळे त्या चिमुरडीचे प्राण वाचले आहेत
  शोध मोहिमेदरम्यान दरम्यान शैलेश आणि इतर पथकाला बिलिमोरा जवळील तळोध गरनाळा जवळ बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. नंतर पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्याठिकाणी जखमी अवस्थेत ती मुलगी सापडली. मुलीला तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. सध्या ही चिमुरडी धोक्याबाहेर असून तिला तिच्या कुटुंबाकडे सुपूर्द करण्यात आले आहे.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published:

  Tags: India, Madhya pradesh, Railway accident, Shocking news, Small baby, Train accident

  पुढील बातम्या