• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • भयंकर! भरधाव कारनं 6 जणांना चिरडलं, पळ काढताना कारसोबतही घडला धक्कादायक प्रकार

भयंकर! भरधाव कारनं 6 जणांना चिरडलं, पळ काढताना कारसोबतही घडला धक्कादायक प्रकार

रस्त्याने भरधाव आलेल्या कारनं सहा मजुरांना चिरडल्याची घटना बिहारमधील पटना भागात घडली आहे. या घटनेत 2 मजुरांचा जागीच मृत्यू झाला असून इतर 4 जण गंभीर जखमी आहेत.

 • Share this:
  पटना, 7 जुलै: रस्त्याने भरधाव आलेल्या कारनं (Over Speeding Car) सहा मजुरांना चिरडल्याची घटना बिहारमधील (Bihar) पटना भागात घडली आहे. या घटनेत 2 मजुरांचा जागीच मृत्यू (2 died) झाला असून इतर 4 जण गंभीर जखमी (4 injured) आहेत. या सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार (Treatment) सुरू आहेत. अत्यंत भरधाव वेगाने गाडी चालवत असल्यामुळे चालकाचं नियंत्रण सुटून हा अपघात झाल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे. असा झाला अपघात पटनाजवळच्या दानापूर परिसरात रस्त्याने काही मजूर चालले होते. हे मजूर कामं शोधण्यासाठी बेटा नावाच्या गावाकडे पायी चालले होते. त्याचवेळी पाठिमागून आलेल्या कारनं त्यांना उडवलं. या अपघातात सहा मजुरांच्या अंगावरून ही कार गेली. यापैकी दोघांचा मृत्यू झाला. मृत कामगारांची ओळख अद्याप पटलेली नाही. तर या धडकेत मनोज कुमार (वय 34), सुनील कुमार (वय 32), विमलेश कुमार (वय 22), दिलबर कुमार (वय 22), विश्वनाथ कुमार (वय 30) आणि बजरंगी (वय 30) हे गंभीररित्या जखमी झाले आहेत. हे वाचा - दगडं, टेबल फॅन हाती जे लागेल त्याने मारलं, नातवाने घेतला आजोबांचा जीव पळून जाण्याचा प्रयत्न या अपघातानंतर कारचालकाने तिथून पोबारा करण्याचा प्रयत्न केला. जखमी अवस्थेतील मजुरांना मदत करण्याऐवजी त्यांनी तिथून पळ काढला. मात्र पळून जात असताना पुन्हा एकदा त्यांचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि ही गाडी एका मोठ्या खड्ड्यात जाऊन पडली. या अपघातमुळे गाडीतील तिघे गंभीर जखमी झाले. ऋषभ कुमार (वय 20), संस्कार कश्यप (वय 19 ) आणि सूरज कुमार (वय 19) हे या अपघातात गंभीर जखमी झाले. त्यांनादेखील तातडीनं रुग्णालयात उपचारांसाठी हलवण्यात आलं आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत असून या अपघातामुळे परिसरात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
  Published by:desk news
  First published: