मैत्रिणी झाल्या वैरीणी! दोन महिला अधिकाऱ्यांमध्ये गायीमुळे उफाळला वाद, मुख्यमंत्री कार्यालयाने केला हस्तक्षेप

मैत्रिणी झाल्या वैरीणी! दोन महिला अधिकाऱ्यांमध्ये गायीमुळे उफाळला वाद, मुख्यमंत्री कार्यालयाने केला हस्तक्षेप

अखेर दोघांमधील वाद सोडविण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयातून हस्तक्षेप करण्यात आला

  • Share this:

गांधीनगर, 22 जानेवारी : दोन मैत्रिणींमध्ये भांडणाची अनेक छोटी-मोठी कारणं असून शकतात. मात्र गुजरातमधील गांधीनगर भागात दोन मैत्रिणींमध्ये भांडणाचं कारण चक्क एक गाय ठरली आहे.

त्याचं झालं असं की नेहा कुमारी आणि उषा राडा या दोघी पोलीस अधिकारी. शिवाय त्या शेजारीच राहतात. दोघीमध्ये छान गप्पा व्हायच्या. मात्र मैत्री तुटण्याचे कारण ठरली आहे ती एक गाय.

काय आहे प्रकरण?

नेहा कुमारी आपल्या सरकारी घराच्या परिसरात वॉलीबॉल खेळत होती. त्यादरम्यान वॉलीबॉल एसपी उषा राडा यांच्या गायीला लागला. यामुळे दोघींमध्ये मोठा वाद सुरू झाला. चिडलेल्या उषाने पोलिसांना हॉलीबॉलचा नेट कापण्यास सांगितले. आणि मध्य गुजरात वीज कंपनींला वॉलीबॉल मैदानातील वीज बंद करण्यास सांगितले. गेल्या दोन वर्षांपासून उषा आणि नेहा चांगल्या मैत्रिणी होत्या. उषा दररोज आपल्या गायीचे दूध नेहाला देत होती. मात्र 26 डिसेंबर रोजी दोघांमध्ये मोठा वाद झाला. हा वाद इतका टोकाला गेला की या दोघी सख्ख्या मैत्रिणी एकमेकांच्या वैरी झाल्या आहेत.

काय आहे उषाचा आरोप

IPS अधिकारी उषा राडाने नेहावर अनेक आरोप केले आहे. नेहा 26 डिसेंबर रोजी 25 लोकांबरोबर माझ्या घरात शिरली आणि माझ्या गायीला दगड मारले. या प्रकरणात मुख्यमंत्री कार्यालयातून राज्यातील वरिष्ठ IAS अधिकारी संगीत सिंहला या प्रकरणाचा तपास करण्य़ास सांगितले आहे. शिवाय दोन्ही अधिकाऱ्यांना वाद आपआपसात मिटवून घ्या, असे आवाहन केले आहे.

अन्य बातम्या

...आणि या घटनेने मुस्लीम आणि काश्मिरी पंडित आले एकत्र

आर्थिक राजधानी आहे रानटी जनावरांचं शहर, तुम्ही कल्पनाही नाही करणार अशी मुंबईची '

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 22, 2020 02:13 PM IST

ताज्या बातम्या