काश्मीर : चकमकीत 2 दहशतवाद्यांचा खात्मा, भारताचे 4 जवान जखमी

काश्मीर : चकमकीत 2 दहशतवाद्यांचा खात्मा, भारताचे 4 जवान जखमी

जम्मू-काश्मीर सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू

  • Share this:

जम्मू, 29 मार्च : गेल्या दोन दिवसांपासून जम्मू आणि काश्मीरमध्ये काही भागात लष्कराने सीआरपीएफ आणि जम्मू पोलिसांच्या मदतीने संयुक्त शोधमोहिम राबवली आहे. आज बडगाम इथल्या शोधमोहिमेवेळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा झाला. अजूनही सुरक्षा दलांची शोधमोहिम सुरू असून आणखी काही दहशतवाद्यांना घेरण्यात आलं आहे. या चकमकीत भारतीय लष्कराचे 4 जवान जखमी झाले.

जम्मू काश्मीरच्या दक्षिण आणि उत्तर भागातील चार ठिकाणी गुरुवारी लष्कर आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई केली होती. यामध्ये शोपियानमधील केलर भागात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाने तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. एका घरात तीन ते चार दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यानंतर लष्कराने सीआरपीएफ आणि जम्मू पोलिस यांच्या मदतीने संयुक्त मोहिम राबवली. तीन दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर मोठा शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला.

गेल्या आठवड्याभरात जिल्ह्यातील ही दुसरी चकमक होती. मागच्या आठवड्यात सुरक्षा दलाने इमामसाहीब भागात एका दहशतवाद्याला ठार केलं होतं. शुक्रवारी (22 मार्च) पहाटेच्या सुमारास शोपियान जिल्ह्यातील इमाम साहेब परिसरातही चकमक झाली. परिसरातील एका घरात दोन-तीन दहशतवादी लपून बसले होते. त्याचवेळी बांदीपोरा येथील चकमकीदरम्यान लष्कर-ए-तोयबाचा टॉपचा कमांडर अली भाईसहीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं. यात ठार करण्यात आलेला अली भाई हा पाकिस्तानातील दहशतवादी होता.

दरम्यान, बारामुल्ला जिल्ह्यात गुरुवारी (21 मार्च) झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना जवानांनी कंठस्नान घातलं होतं.यामध्ये एका अधिकाऱ्यासहीत तीन जवान जखमी झाले होते.

SPECIAL REPORT : पार्थ पवारांचा मावळ जिंकण्याचा मनसुबा, काँग्रेसची नाराजी महागात पडणार?

First published: March 29, 2019, 7:45 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading