श्रीनगर, 06 एप्रिल : सीमारेषेवर दहशतवाद्यांची घुसखोरी सुरूच आहे. भारतीय लष्कराकडून दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई केली जात आहे. दरम्यान, काश्मीरमधील शोपियाँ जिल्ह्यात झालेल्या चकमकीत लष्करानं दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. सैन्यांच्या तुकडीसोबत दहशतवाद्यांची दुपारी चकमक झाली. यामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. काश्मीरच्या दक्षिण भागात ही कारवाई करण्यात आली. भारतीय लष्कर पेट्रोलिंग करत असताना त्यांच्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. त्याला चोख प्रत्युत्तर जवानांनी दिलं. मागील काही दिवसांपासून दहशतवाद्यांची घुसखोरी सतत सुरू आहे. त्याला लष्कराकडून देखील चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे. मागील काही दिवसांमध्ये अनेक टॉपच्या दहशतवाद्यांचा खात्मा हा लष्कराकडून करण्यात आला आहे.सध्या काश्मीर घाटीमध्ये दहशतवादी कारवाया देखील वाढल्या आहेत. पुलवामा हल्ल्यानंतर दहशतवाद्यांविरोधात जोरदार शोध मोहिमदेखील हाती घेण्यात आली आहे. दहशतवादी हे स्थानिकांच्या घरात देखील लपून बसत आहेत. त्यांचा खात्मा करण्यासाठी काही वेळा लष्करानं घरं देखील उडवून दिलं आहे.
Visuals: Two terrorists killed in exchange of fire between terrorists and security forces in Imam Sahib area of Shopian district. (Visuals deferred by unspecified time) #JammuAndKashmirpic.twitter.com/s7l5vnifMS
Jammu & Kashmir: Two terrorists killed in exchange of fire between terrorists and security forces in Imam Sahib area of Shopian district. pic.twitter.com/ISv9nYQF0w
दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी सरकारनं लष्कराला पूर्ण अधिकार दिले आहेत. जखमी किंवा जवान शहीद होत असल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांच्या सुरक्षेसाठी योग्य ती पावलं देखील उचलली गेली आहेत. कारवाईदरम्यान घाई न करता थांबून कारवाई करण्याचे आदेश जवानांना देण्यात आले आहेत.
पाकिस्तानी लष्काराचं या दहशतवाद्यांच्या घुसखोरीला समर्थन आहे. पाकिस्तान लष्कर देखील भारतीय चौक्यांना लक्ष करत असून त्याला भारताकडून देखील चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे. पाकिस्तानच्या कुरापतींमुळे सीमेजवळच्या गावांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. शिवाय, काही गावांना सुरक्षित स्थळी देखील हलवण्यात आलं आहे. पुलवामा हल्ल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध काहीसे ताणले गेले आहेत.
नेते प्रचाराला अन् गावकरी पाण्याला; हिंगोली जिल्ह्याचा SPECIAL REPORT