Home /News /national /

Assam Floods: पत्त्याच्या बंगल्याप्रमाणं कोसळलं 2 मजली पोलीस स्टेशन! पुराचा थरारक VIDEO आला समोर

Assam Floods: पत्त्याच्या बंगल्याप्रमाणं कोसळलं 2 मजली पोलीस स्टेशन! पुराचा थरारक VIDEO आला समोर

पूर परिस्थितीची अंदाज घेऊन या इमारतीमधून आधीच पोलीस आणि कर्मचाऱ्यांना दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आलं असल्याने मोठा धोका टळला. आसाममध्ये आलेल्या अनेक नद्यांच्या पुराचे पाणी वेगात धावत आहे.

    गुवाहाटी, 28 जून : आसामधील पूर परिस्थिती आता काहीशी नियंत्रणात येत आहे. नद्यांतील पाण्याची पातळी आता हळूहळू कमी होत आहे. मात्र अजूनही 22 लाख नागरिक पुरामुळे बाधित आहेत. अनेक ठिकाणची पाणी पातळी जास्त असून पाण्याचा वेगही कमालीचा आहे. आसाममधील एक दुमजली पोलीस  (Assam flood situation) स्टेशन पुरात बुडाल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. हे पोलीस स्टेशन नुसतं पाण्यात बुडलं नाही तर पाण्याच्या वेगामुळे पोलीस स्टेशनची इमारत मोडून पडली. नलबारी जिल्ह्यातील बोरखेत्री अंतर्गत भांगनामारी पोलीस स्टेशनची ही अवस्था झाली आहे. आसामच्या पुराची भीषणता दर्शवणारा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. पूर परिस्थितीची अंदाज घेऊन या इमारतीमधून आधीच पोलीस आणि कर्मचाऱ्यांना दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आलं असल्याने मोठा धोका टळला. आसाममध्ये आलेल्या अनेक नद्यांच्या पुराचे पाणी वेगात धावत आहे. दोन मजली हे पोलीस स्टेशन काही वेळातच पत्त्याच्या पानांप्रमाणे कोसळू लागले. स्थानिकांनी मोबाईलमध्ये केलेल्या व्हिडिओमुळे तेथील पूराची भीषणत दिसून येत आहे. दरम्यान, तेथईस छच्चर जिल्ह्यातील सीलचर शहरातील परिस्थिती बिकट आहे. अनेक भागात पुराचे पाणी साचले आहे. पुरात अडकून मृत्यू पावलेल्या लोकांची संख्या सातत्याने वाढत आहे. अनेकजण अजूनही बेपत्ता आहेत. राज्यातील 28 जिल्ह्यातील 22 लाख 21 हजार नागरिक पुराच्या छायेत आहेत. हे वाचा - Diabetes असणाऱ्यांनी सकाळ-संध्याकाळ चावून खावी ही 2 प्रकारची पानं; दिसेल परिणाम दरम्यान, कोपिली, बराक आणि कुशिआरा या नद्या आता धोक्याच्या पातळीवर वाहत आहेत. सीलचर शहर गेल्या आठवड्यापासून पुराच्या पाण्याखाली आहे. तेथे अडकलेल्या नागरिकांना मदत करण्यासाठी प्रशासनाने पावले उचलली. हवाई दलाच्या हेलिकॉप्टरमधून नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला. हे वाचा - पुरुषांच्या केसांसाठी परिणामकारक आहेत हे वीगन हेयर मास्क; घरीच असे करा तयार ड्रोनचा प्रभावी वापर पुरात अडकलेल्या नागरिकांचा शोध घेण्यासाठी ड्रोनचा प्रभावी वापर केला. त्या माध्यमातून नागरिकांचे ठिकाणे शोधली. ड्रोनचा वापर पूरग्रस्त सीलचर शहरात केला जात आहे. तसेच आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि आंतरराष्ट्रीय मदतकार्य संघटनांनी बोटीतून मदतकार्य करण्याची मोहीम राबविली आहे. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा यांनी पूरग्रस्त भागाची गेल्या दोन दिवसांत दोनदा पाहणी केली. तसेच रविवारी मदत आणि सुटका कार्याचा आढावा घेतला. दरम्यान, राज्यातील 75 महसुली क्षेक्षातील 2 हजार 542 गावांना पुराचा फटका बसला आहे. 2 लाख 17 हजार 413 नागरिकांनी 564 छावण्यात आश्रय घेतला आहे. पुरामुळे अनेक ठिकाणी जमीन धसण्याचे आणि दरडी कोसळण्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Assam, Rain flood

    पुढील बातम्या