Home /News /national /

सगळ्यांच्या डोळ्यादेखत कोसळली 2 मजली इमारत, 6 जणांची मृत्यूच्या दारातून सुटका

सगळ्यांच्या डोळ्यादेखत कोसळली 2 मजली इमारत, 6 जणांची मृत्यूच्या दारातून सुटका

ढिगाऱ्याखालून बाहेर काढलेले सर्व जण जखमी झाले असून त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.

    देवास 25 ऑगस्ट: महाडमधली घटना ताजी असतांनाच मध्य प्रदेशातल्या देवास इथेही मंगळवारी दोन मजली इमारत कोसळली. भर दुपारी ही इमारत अचानक कोसळली. त्यामुळे एकच खळबळ उडाली. इथल्या लाल गेट परिसरात ही इमारत होती. इमारत कोसळल्यानंतर एकच गोंधळ उडाला बचावासाठी पुढे आलेल्या लोकांनी 6 जणांना बाहेर काढलं. इमारत कोसळत असतांना अनेकांनी ते दृश्य पाहिलं होतं. ढिगाऱ्याखालून बाहेर काढलेले सर्व जण जखमी झाले असून त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. यात काही जण दबलेले असू शकतात अशी शक्यताही व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती कळताच प्रशासकीय अधिकारी आणि स्थानिक लोक मदतीसाठी धावून आले. त्यांनीच ढिगाऱ्याखालून लोकांना बाहेर काढलं. आता अधिक कुमक बोलविण्यात आली असून मदत कार्याला वेग देण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यातील महाड इमारत दुर्घटनेत NDRF कडून मोठं बचावकार्य केलं गेलं. या ढिगाऱ्याखालून 18 तासांनंतर सहा वर्षाच्या मुलाला बाहेर काढण्यात यश आलं आहे. या चिमुकल्या मुलाला ढिगाऱ्याखालून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात NDRFच्या जवानांना यश आलं आहे. सोमवारी संध्याकाळी 6.30 च्या सुमारास महाडमधील तारिक गार्डन नावाची 5 मजली इमारत कोसळली. त्यानंतर पोलीस आणि NDRF टीमकडून बचावकार्य सुरू आहे. सकाळी एक मृतदेह बाहेर काढण्यात आला होता आता एका मुलाला सुखरूप वाचवण्यात यश आलं आहे. या दुर्घटनेप्रकरणी 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात बिल्डराचा समावेश आहे. या इमारतीचे बांधकाम करणाऱ्या बिल्डरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्यासोबत तत्कालीन मुख्याधिकारी, वास्तुविशारद, नगरपालिका इंजिनिअर आणि Rcc कन्सल्टन्स अशा पाच जणांवर गुन्हे दाखल केले आहे.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    Tags: Madhya pradesh

    पुढील बातम्या