लखनऊ, 4 ऑगस्ट : दोन तरुण मुलं (two sons) आपल्या वडिलांचा मृतदेह (Father's dead body) बाईकवरून (bike) घेऊन चालल्याचा फोटो सध्या देशभर चर्चेत आहे. वडिलांच्या मृत्युनंतर अँब्युलन्स (Ambulance) न मिळाल्याने या दोघांनी नाईलाजाने त्यांना आपल्या बाईकवरून घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. ही घटना पाहून तिथल्या उपस्थितांचं काळीज हेलावलं आणि अऩेकांनी ही घटना कॅमेऱ्यात कैद केली.
उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खिरी जिल्ह्यातील गावात आपल्या वडिलांची तब्येत बिघडल्यामुळे मुलांनी अँब्युलन्सला फोन लावला. मात्र अऩेक प्रयत्न करूनही अँम्ब्युलन्स आलीच नाही. त्यानंतर त्यांनी वडिलांना बाईकवरून हॉस्पिटलमध्ये नेण्याचा निर्णय घेतला. दोन तरुण मुलं बाईकवर बसली आणि वडिलांना गाडीवर मधे बसवून त्यांना हॉस्पिटलला नेण्यात आलं.
उपचारांना विलंब झाल्याचा आरोप
हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर डॉक्टरांनी उपचार उशिरा सुरू केल्याचा आरोप मुलांनी आणि नातेवाईकांनी केला आहे. त्यामुळे उपचारादरम्यान वडिलांचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर या मुलांनी वडिलांचं पार्थिव घरी नेण्यासाठी पुन्हा अँब्युलन्सला फोन लावला. मात्र यावेळीही अँम्ब्युलन्स मिळाली नाही. त्यामुळे सुन्न झालेल्या मुलांनी बाईकवरूनच वडिलांचा मृतदेह नेण्याचा निर्णय घेतला. वडिलांचं पार्थिव बाईकवर ठेवत असताना तिथं बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. हा प्रसंग पाहून अनेकांचे डोळे पाणावले.
हे वाचा -पुण्यासह कोकणाला झोडपणार पाऊस; राज्यात 7 जिल्ह्यांना हवामान खात्याकडून अलर्ट
उत्तर प्रदेशात अँम्ब्युलन्सचा संप
उत्तर प्रदेशात सध्या अँम्ब्युलन्स चालकांचा संप सुरु आहे. त्यामुळे राज्यातील रुग्णांचे मोठे हाल होत आहेत. सरकार अँम्ब्युलन्स चालकांची वाटाघाटी न करता वेगळी यंत्रणा उभी करण्याचा प्रयत्न करत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे हा संप चिघळत असून त्यावर लवकरात लवकर तोडगा निघावा, अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिक व्यक्त करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Dead body, Uttar pardesh