मराठी बातम्या /बातम्या /देश /

फेसबुकवरील वादाचा बदला, मोठ्या बहिणीच्या मदतीने सख्ख्या बहिणींवर सामूहिक बलात्कार

फेसबुकवरील वादाचा बदला, मोठ्या बहिणीच्या मदतीने सख्ख्या बहिणींवर सामूहिक बलात्कार

दोन सख्ख्या बहिणींना त्यांच्या राहत्या घरातून नेवून त्यांच्यावर सामूहिक बलात्कार (Gang Rape Case) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

दोन सख्ख्या बहिणींना त्यांच्या राहत्या घरातून नेवून त्यांच्यावर सामूहिक बलात्कार (Gang Rape Case) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

दोन सख्ख्या बहिणींना त्यांच्या राहत्या घरातून नेवून त्यांच्यावर सामूहिक बलात्कार (Gang Rape Case) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

    जयपूर, 06 जून : दोन सख्ख्या बहिणींना त्यांच्या राहत्या घरातून नेवून त्यांच्यावर सामूहिक बलात्कार (Gang Rape Case) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. खळबळजनक बाब म्हणजे या दोन बहिणींची असलेल्या मोठ्या बहिणीने या प्रकारात आरोपींना मदत केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. या घटनेतील तीन आरोपी हे अल्पवयीन आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही पीडित बहिणी गेल्या दोन महिन्यांपासून जयपूरमधील प्रतापनगर परिसरातील फ्लॅटमध्ये राहत होत्या. या दरम्यान आरोपी अल्पवयीन मुलांनी फेसबुकच्या माध्यमातून पीडित मुलींच्या मोबाइल क्रमांकावर कॉल करून संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी या मुलांना चांगले फटकारले. या वादामुळं त्यांना आपला अपमान झाल्यासारखे वाटले, त्यावर या अल्पवयीन मुलांसह त्यांच्या एका मित्राने दोन्ही बहिणींना धडा शिकवण्याचा निर्णय घेतला. तिन्ही अल्पवयीन मुलांनी बलात्कार पीडित मुलींच्या मोठ्या बहिणीचा प्रियकर दयाराम मीना (वय 25) याच्याशी संपर्क साधला. दयारामच्या मदतीने त्यांना समजले की, दोन्ही बहिणी प्रताप नगरमधील एका अपार्टमेंटमध्ये फ्लॅट घेऊन राहत आहेत. त्यानंतर 1 जून रोजी सायंकाळी चारच्या सुमारास हे तिन्ही अल्पवयीन मुले आणि त्यांचा साथीदार रवींद्र मीना (वय 21) फ्लॅटवर पोहोचले. तेथे आरोपींनी पिस्तुलाचा धाक दाखवत दोन्ही बहिणींचे अपहरण केले. त्यांना जबरदस्तीने दुचाकीवरून नेले आणि जगतपुरा येथील घरात कोंडले आणि तेथे या सर्व आरोपींनी दोघींवर सामूहिक बलात्कार केला, त्यांना मारहाणही केली, असे डीसीपी (पूर्व) अभिजित सिंह यांनी सांगितले. हा सर्व प्रकार राजस्थानच्या जयपूरमधील आहे. पीडित बहिणींनी तक्रारीत म्हटले आहे की, सामूहिक बलात्कारानंतर आरोपींनी त्यांना रात्री आठच्या सुमारास फ्लॅटवर आणून सोडले. त्यांनी दोन्ही बहिणींना धमकावलं की, त्यांनी याबाबत कोणास काही सांगितले तर ते त्यांना ठार मारतील. अशा परिस्थितीत दोन्ही बहिणी घाबरल्या होत्या. त्यानंतर दोन दिवसांनी मात्र त्यांनी धाडस करून प्रतापनगर पोलीस ठाणे गाठले आणि चार तरुणांविरूद्ध गुन्हा दाखल केला. तसेच पोलिसांना त्यांनी दोन आरोपींची नावेही सांगितली. त्यावरून पोलिसांनी इतरांचाही शोध घेतला आणि काल सर्व आरोपींना अटक केली. मोठ्या बहिणीनं आणि तिच्या प्रियकरानं केली मदत  सामूहिक बलात्कार पीडित दोन्ही मुलींची मोठी बहीण तिचा प्रियकर दयाराम मीनाबरोबर जयपूरमध्ये राहत होती, अशी माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. दोन्ही बहिणींनी याला विरोध दर्शविला होता. या दोघांनाही दयारामबरोबर राहणारी मोठी बहीण आवडली नाही. अशा परिस्थितीत मोठी बहीण आणि दयाराम यांनीही दोन्ही पीडितांचा सूड उगवण्यासाठी सामूहिक बलात्कारात सहभागी आरोपींना सहकार्य केले. त्यांना पीडितेच्या घराचा पत्ता सांगितला. तिथे घेऊन गेले. पोलिस या प्रकरणाची सखोल चौकशी करीत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Gang Rape, Rape, Rape accussed

    पुढील बातम्या