जाती, धर्माच्या पलीकडे! किडनी दान करून शिख-मुस्लिम महिलांनी जपलं माणुसकीचं नातं

जाती, धर्माच्या पलीकडे! किडनी दान करून शिख-मुस्लिम महिलांनी जपलं माणुसकीचं नातं

मुस्लिम महिलेने शिख पुरुषाला आणि शिख महिलेने मुस्लिम पुरुषाला किडनी दान करून दिलं जीवदान

  • Share this:

लुधियाना, 7 नोव्हेंबर: जगात माणुसकीचा धर्म सर्वश्रेष्ठ आहे, हे पुन्हा सिद्ध झालं आहे. पंजाबमध्ये मुस्लिम महिलेने शिख पुरुषाला आणि शिख महिलेने मुस्लिम पुरुषाला किडनी दान करून जीवदान दिलं. माणुसकीचं नातं हे रक्ताच्या नात्यापेक्षाही महान आहे, असा संदेश या दोन्ही महिलांनी समाजाला दिली आहे. या दोन्ही महिलांवर सर्वत्र कौतुकांचा वर्षाव होत आहे.

मालेरकोटलामधील जमालपूर आणि फतेहगड साहिबमधील डरेन येथील राहणाऱ्या या दोन्ही महिला समाजातील इतर महिलांसाठी प्रेरणा बनल्या आहेत. शिख महिलेने आपली एक किडनी दान करून मुस्लिम व्यक्तीला जीवदान दिलं तर मुस्लिम महिलेनं आपली किडनी देऊन शिख व्यक्तीचे प्राण वाचवला आहे.

हेही वाचा... आयुष्यभर ब्रम्हचारी राहिलेल्या माधव पाटलांनी 66 वर्षी का थाटला संसार?

फतेहगड येथी मनप्रीत कौर हिनं मालेरकोटला येथील मुस्लिम व्‍यक्तीला आपली एक किडनी दिन केली तर मालेरकोटला येथील शकीला नामक मुस्लिम महिलेनं फतेहगड येथील शिख तरुणाला आपली किडनी देऊन त्याला जीवदान दिलं. शनिवारी दोन्ही महिलांना उपायुक्तांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं. यावेळी दोन्ही महिलांनी अवयव दान करण्याची आवाहन केलं. अवयव दान करून आपण दुसऱ्याचे प्राण वाचवू शकतो, असंही सांगितलं.

चंडीगड येथील अकाई हॉस्पिटलमध्ये दोन्ही रुग्णांवर एकाच वेळी किडनी ट्रान्सप्लांट सर्जरी करण्यात आली. यातील एक रुग्ण शिख तर दुसरा मुस्लिम कुटुंबातील आहे. विशेष म्हणजे, शिख कुटुंबातील महिलेनं आपली एक किडनी मुस्लिम व्यक्तीला तर मुस्लिम कुटुंबातील महिलेनं आपली एक किडनी शिख व्यक्तीला जीवनदान मिळालं आहे.

हेही वाचा...लाल छडी मैदान खडी... प्रिया बापटचं रेड ड्रेसमध्ये सुपरहॉट PHOTOSHOOT

दुसरीकडे, जाती धर्माच्या नावावर संपूर्ण जगात राजकारण केलं जात आहे. मात्र, माणुसकीचा धर्म सर्वश्रेष्ठ आहे. माणुसकीचं नातं हे रक्ताच्या नात्यापेक्षाही महान आहे, हे दाखवून दिलं आहे. जगात दोन वेगवेगळ्या धर्मातील दोन महिलांना एकमेकांच्या नातेवाईकांना अवयव दान केलं, कदाचित जगात ही पहिलाच घटना असावी, असं किडनी ट्रान्सप्लांट करणारे डॉ. बलदेव सिंह ओलख यांनी म्हटलं आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: November 7, 2020, 10:05 PM IST
Tags: Punjab

ताज्या बातम्या