Home /News /national /

PPE किटमुळे मृत्यू? कोरोनाग्रस्ताच्या अंत्यसंस्कारावेळी दोन नातलगांचा रहस्यमय मृत्यू

PPE किटमुळे मृत्यू? कोरोनाग्रस्ताच्या अंत्यसंस्कारावेळी दोन नातलगांचा रहस्यमय मृत्यू

अंत्यसंस्काराला नदीकिनारी गेले तेव्हा 42 अंश सेस्लिअस एवढं तापमान होतं. या उष्णतेमध्ये त्यांनी Coronavirus पासून बचाव करण्यासाठी PPE किट परिधान केली होती.

    जम्मू, 20 जून : Coronavirus मुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला. त्याच्या अंत्यसंस्काराला गेलेल्या नातेवाईकांपैती दोघांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. डॉक्टरांनी या दोघांच्या अचानक झालेल्या मृत्यूचं कारण अजून स्पष्ट झालं नसल्याचं सांगितलं आहे. पण कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार त्यांनी अंत्यसंस्कारासाठी PPE किट वापरली होती. अतिउष्णतेने त्यात गुदमरून त्यांचा मृत्यू झाला. जम्मूमध्ये ही घटना घडली. विशेष म्हणजे या घटनेत अकस्मात मृत्यू झालेले दोघेही तरुण आहेत आणि 40 च्या आतल्या वयाचे आहेत. जम्मूच्या तवी नदीच्या जवळ कोरोनामुळे मृत्यू झालेल्या नातलगाच्या अंत्यसंस्काराला गेलेले असताना दोघांचा मृत्यू झाला. सध्या जम्मू परिसरात प्रचंड गरमी वाढली आहे. अंत्यसंस्काराला नदीकिनारी गेले तेव्हा 42 अंश सेस्लिअस एवढं तापमान होतं. या उष्णतेमध्ये त्यांनी Coronavirus पासून बचाव करण्यासाठी PPE किट परिधान केली होती. काही कळायच्या आत अंत्यसंस्कार विधी पूर्ण होण्यापूर्वीच दोघे जण घेरी येऊन पडले आणि त्यांचा मृत्यू झाला. अकस्मात मृत्यू झाला त्यापैकी एकाचं वय 40 वर्षं तर दुसऱ्याचं 35 वर्षं होतं. सौरव गांगुलीच्या परिवारापर्यंत पोहोचला Corona; कुटुंबातले 4 जण पॉझिटिव्ह अनिल चोपडा या नातेवाईकांचा आरोप आहे की, PPE किट घातल्यामुळे त्यांना कुणी पाणीही पाजलं नाही आणि डिहायड्रेशनमुळे त्यांचा मृत्यू झाला. चोपडा यांचा एक 65 वर्षांचा आप्त Coronavirus चा संसर्ग होऊन मरण पावला. त्याच्या अंत्यसंस्कारासाठी तवी नदीवर शव घेऊन सगळे निघाले होते. कूलर लावण्यासाठी हटवला व्हेंटिलेटरचा प्लग, कोरोनामुळे नाही तर असा झाला मृत्यू पोलीस आणि आरोग्य सेवकांच्या प्रोटोकॉलनुसार PPE किट घातलेली होती. पण उन्हामुळे दोघांना घेरी आली आणि पाणीही न प्यायल्याने त्यांचा मृत्यू झाला असावा, असं चोपडा यांचं म्हणणं आहे.
    First published:

    Tags: Corona, Corona virus

    पुढील बातम्या