S M L

काश्मीरमध्ये आणखी दोन दहशतवाद्यांचा खात्मा, रात्रीपासून चकमक सुरू

दक्षिण काश्मीरमधील बडग्राम जिल्ह्यातील चाडूरा जवळ मंगळवारी रात्री झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले आहेत.

News18 Lokmat | Updated On: May 22, 2019 07:56 AM IST

काश्मीरमध्ये आणखी दोन दहशतवाद्यांचा खात्मा, रात्रीपासून चकमक सुरू

जम्मू, 22 मे: दक्षिण काश्मीरमधील बडग्राम जिल्ह्यातील चाडूरा जवळ मंगळवारी रात्री झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले आहेत. या परिसरात आणखी काही दहशतवादी लपल्याची शक्यता असल्याने भारतीय सुरक्षा दलांनी सर्च ऑपरेशन सुरु केले आहे. तसेच संपूर्ण परिसराला घेराव घातला आहे.

बडग्राम येथील चाडूरा जवळच्या गोपालपोरा-कुलग्राम येथे काही दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर भारतीय जवानांनी सर्च ऑपरेशन सुरु केले. घरांची तपासणी करताना दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु केला. त्याला उत्तर देण्यासाठी जवानांनी केलेल्या गोळीबारात दोन दहशतवादी ठार झाले. घटनास्थळी आणखी काही दहशतवादी लपल्याची शक्यता आहे. दोन्ही बाजूने गोळीबार सुरु असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

काश्मीरमध्ये गेल्या 5 दिवसात विविध ठिकाणी झालेल्या चकमकीत 10हून अधिक दहशतवादी ठार झाले आहेत. पुलवामा आणि शोपियां येथे गुरुवारी झालेल्या चकमकीत 6 दहशतवादी ठार झाले होते. तर दक्षिण काश्मीरमधीलच पुलवामामधील पंजग्राम सेक्टरमध्ये शनिवारी झालेल्या चकमकीत 3 दहशतवादी ठार झाले होते.


गेल्या 5 महिन्यात लष्कराने केला 86 दहशतवाद्यांचा खात्मा

2019 मध्ये म्हणजे गेल्या 5 महिन्यात तब्बल 86 दहशतवाद्यांचा खात्मा केल्याची माहिती लष्कराने काही दिवसांपूर्वी दिली होती आज दिली. यापुढेही अतिरेक्यांची ही मोहिम सुरूच राहणार असल्याचही त्यांनी सांगितले. जम्मू आणि काश्मीरमध्ये लष्कराने दहशतवाद्यांविरुद्ध सर्वच स्तरांमधून मोहिम सुरू केलीय. धडक कारवाई करणं, लोकांमध्ये विश्वास निर्माण करणं आणि दहशतवाद्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणं अशा प्रत्येक पातळीवर ही मोहिम सुरू आहे. 'ऑपरेशन ऑल आऊट' असं नाव या मोहिमेला देण्यात आलंय. गेल्या दोन वर्षांपासून लष्कराची ही मोहिम सुरू आहे. याच कारवाईत 20 जणांना अटकही करण्यात आली आल्याचे भारतीय लष्कराने सांगितले.

या मोहिमेत लष्कराने दहशतवाद्यांची एक हिट लिस्ट तयार केलीय. या यादीतल्या दहशतवाद्यांचा माग घेऊन त्यांना ठार केलं जातं किंवा अटक केली जाते. हे दहशतवादी काही घातपात घडविण्याच्या आधीच त्यांना संपवलं जातं. त्यांनी घातपात घडविल्यावर शोध घेण्यापेक्षा आधीच आक्रमक धोरण स्वीकारलं तर मोठी हानी टाळली जाते असं लष्कराचं मत आहे. पुलवामा हल्ल्याला जबाबदार असलेल्या आणि त्यांना मदत करणाऱ्या सर्वांना लष्कराने कारवाई करत महिनाभरातच यमसदनी पाठवलं होतं. लष्कर ही यादी सातत्याने अपडेटही करत असते.

Loading...


SPECIAL REPORT : एक्झिट पोल खरंच विश्वासार्ह आहे का?


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 22, 2019 07:56 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close