चेन्नई, 17 नोव्हेंबर : तमिळनाडूतील पलानी परिसरात एका थिएटर मालकाने दोघांवर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. गोळीबार करत दोघांच्या हत्येचा प्रयत्न करणाऱ्या थिएटर मालक नटराजनला तमिळनाडू पोलिसांनी अटक केली आहे.
सोमवारी सकाळच्या सुमारास तमिळनाडूच्या दींडीगुल जिल्ह्यातील पलानी भागात थिएटर मालक नटराजन यांचा इलंगोवन यांच्याशी जमीन मालमत्तेवरून वाद झाला. जमिनीवरून वाद सुरू असतानाच नटराजनने बंदुकीतून गोळीबार केला. यात दोन जण जखमी झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वल्लूवर थिएटरचे मालक नटराजन यांचा अक्करायपट्टी गावातील शेतकरी इलंगोवन यांच्याशी जमीनबाबत वाद होता. पलानी येथील प्रमुख भाग असलेल्या अप्पर स्ट्रीटवरील जमिनीच्या तुकड्यावरून हा वाद आहे. दोघांनी काही वर्षांपूर्वी हे प्रकरण कोर्टात नेलं होतं. यात कोर्टाने इलंगोवन यांची बाजू घेतली होती. त्यानंतर नटराजन यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.
#WATCH Tamil Nadu: Two men were injured after being shot by a person over a land dispute in Palani area of Dindigul district on Sunday.
"The accused has been arrested," said Dindigul SP Ravali Priya. pic.twitter.com/NB54HpZpSG
— ANI (@ANI) November 16, 2020
आता या जमिनीच्या वादातून थिएटर मालक नटराजनने, इलंगोवन यांच्यावर आणि त्यांच्यासोबत असलेल्यांवर गोळीबार केला. गोळीबाराची संपूर्ण घटना जवळच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या नटराजन यांना अटक केली आहे.