जम्मू आणि काश्मीरमध्ये लष्कर ए तोयबाचे 2 दहशतवादी ठार

जम्मू आणि काश्मीरमध्ये लष्कर ए तोयबाचे 2 दहशतवादी ठार

जावेद अहमद भट आणि अदील बशीर वाणी असं ठार झालेल्या दोन दहशतवाद्यांची नावे आहेत.

  • Share this:

श्रीनगर 12 मे : जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरक्षा दलाने रविवारी लष्कर ए तोयबाच्या दोन दहशतवाद्यांना ठार केलं. हे दहशतवादी सुरक्षा दलाच्या हिट लिस्टवर होते. हिंद सीता पोरा भागात झालेल्या चकमकीत हे दहशतवादी मारले गेले.

जावेद अहमद भट आणि अदील बशीर वाणी हे या दोन दहशतवाद्यांची नावे आहेत. हे दोघही कुलगाम जिल्ह्यातले होते. हे अतिरेकी लपून बसले असल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. त्यानंतर त्यांनी दहशतवादी लपलेल्या भागाला वेढा घातला त्यानंतर दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक उडाली त्यात हे अतिरेकी मारले गेले.

जावेद आणि अदील यांच्यावर पोलीस स्टेशनमध्येही अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद होती अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. सुरक्षा दलांनी गेल्या दोन वर्षांपासून जोरदार मोहीम राबवून अनेक दहशतवाद्यांना ठार केलं. त्यासाठी ऑपरेशन ऑल ऑउट राबविण्यात येत आहे.

ISJKच्या कमांडरचा खात्मा

जम्मू-काश्मीरमधील शोपियाँ येथे सुरक्षा दलाने  काही दिवसांपूर्वीच ISJKच्या कमांडरचा खात्मा केला होता. त्यावेळी घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठादेखील जप्त करण्यात आला आहे.

शोपियाँ जिल्ह्यातील गावात दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलाच्या जवानांना मिळाली होती. यानुसार सुरक्षा दलानं शुक्रवारी (10 मे) पहाटे परिसरात शोधमोहीम राबवण्यास सुरुवात केली. शोध मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी जवानांवर अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली.

या हल्ल्याला जवानांनी चोख प्रत्युत्तर देत एका दहशतवाद्याला कंठस्नान घातलं. दरम्यान, ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्याचं नाव इशाक सोफी (अब्दुल्ला) असून तो सोपोरमधील रहिवासी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसंच तो इस्लामिक स्टेट ऑफ जम्मू-काश्मीर संघटनेचा कमांडर असल्याचंही म्हटलं जात आहे.

First published: May 12, 2019, 11:34 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading