मराठी बातम्या /बातम्या /देश /फटाका फॅक्टरीमध्ये भयंकर स्फोट, दोघांच्या चिंधड्या तर 2 जण गंभीर जखमी

फटाका फॅक्टरीमध्ये भयंकर स्फोट, दोघांच्या चिंधड्या तर 2 जण गंभीर जखमी

उत्तराखंडमध्ये फटाक्याच्या फॅक्टरीमध्ये आग लागल्यामुळे दोघांचा मृत्यू झाला आहे. आग लागल्यानंतर हा परिसर पुरता हादरून गेला होता. यामध्ये आणखी दोनजणं गंभीर जखमी झाले आहेत.

उत्तराखंडमध्ये फटाक्याच्या फॅक्टरीमध्ये आग लागल्यामुळे दोघांचा मृत्यू झाला आहे. आग लागल्यानंतर हा परिसर पुरता हादरून गेला होता. यामध्ये आणखी दोनजणं गंभीर जखमी झाले आहेत.

उत्तराखंडमध्ये फटाक्याच्या फॅक्टरीमध्ये आग लागल्यामुळे दोघांचा मृत्यू झाला आहे. आग लागल्यानंतर हा परिसर पुरता हादरून गेला होता. यामध्ये आणखी दोनजणं गंभीर जखमी झाले आहेत.

रुडकी, 19 मार्च: उत्तराखंडमध्ये फटाक्याच्या फॅक्टरीमध्ये आग लागल्यामुळे (Fire at Firecracker Factory) दोघांचा मृत्यू झाला आहे. आग लागल्यानंतर हा परिसर पुरता हादरून गेला होता. यामध्ये आणखी दोनजणं गंभीर जखमी झाले (2 people killed and 2 are injured in fire) आहेत. पिरान कलियर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ही घटना घडली. ही आग कशामुळे लागली याचा शोध पोलीस घेत आहेत. दरम्यान याठिकाणी कारखान्यास नव्हे तर केवळ गोदामासाठी परवाना मिळाला होता. तरी देखील फटाक्यांचा कारखाना चालवला जात असल्याची माहिती आतापर्यंतच्या तपासात समोर आली आहे. यामध्ये भाजल्यामुळे दोघांचा मृत्यू झाला असून दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. तर मृतांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार याठिकाणच्या लोकांनी गर्दीच्या ठिकाणी देखील फटाक्यांचे गोडाऊन बनवले आहे, यावर अनेक वेळा पोलीस प्रशासनाने कारवाई देखील केली आहे. पण या गोदामांची संख्या काही कमी होत नाही. पोलिसांनी अशी माहिती दिली आहे की, रुडकी याठिकाणी राहणाऱ्या एका व्यक्तीने पिरान कलियरमध्ये गोदाम बांधले आहे. गुरुवारी दिवसा कारखान्यात काम करत असताना स्फोट झाला. यामध्ये येथे काम करणाऱ्या चौघांपैकी दोघांच्या चिंधड्या उडाल्या. या दुर्घटनेमध्ये कारखाना आणि गोदाम देखील जळून खाक झाले.

(हे वाचा-गाडी धडकणार इतक्यात... थोडक्यात बचावला चिमुरडा, काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO)

कारखान्यात झालेल्या या भीषण स्फोटानंतर आसपासचे लोक काही काळ सुन्न झाले होते. हा कारखाना शहरापासून थोडा दूर होता, नाहीतर आणखी नुकसान होण्याची शक्यता होती. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवले.

एसपी ग्रामीण प्रमेंद्र डोबाल यांनी अशी माहिती दिली आहे की, आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याठिकाणी फटाक्यांचा गोदामासाठी परवाना मिळाला होता, पण त्याठिकाणी कारखाना चालविला जात होता. सध्या या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

First published:

Tags: 2 severely injured, Death, Fire, India, Shocking news, Uttarakhand