Jammu kashmir : कुलगाममध्ये लष्कर-ए-तोएबाच्या दोन दहशतवाद्यांचं आत्मसमर्पण

Jammu kashmir : कुलगाममध्ये लष्कर-ए-तोएबाच्या दोन दहशतवाद्यांचं आत्मसमर्पण

जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून दहशतवादी आणि सुरक्षा दलामध्ये चकमकीच्या घटना समोर येत आहेत.

  • Share this:

श्रीनगर, 22 डिसेंबर : जम्मू-काश्मीरमध्ये डीसीसी निवडणूकांच्या निकालांदरम्यान, कुलगाम जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलात चकमक झाली. यावेळी लष्कर-ए-तोएबाच्या दोन स्थानिक दहशतवाद्यांनी सरेंडर केलं आहे. काश्मीर झोन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दहशतवाद्यांनी त्यांच्या कुटुंबियांच्या आवाहानानंतर आत्मसमर्पण केलं आहे. या दोन दहशतवाद्यांकडून पोलिसांनी दोन पिस्तुल आणि दारूगोळा जप्त केला आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून दहशतवादी आणि सुरक्षा दलामध्ये चकमकीच्या घटना समोर येत आहेत. 13 डिसेंबर रोजी जम्मू-काश्मीरच्या पुंछमध्ये झालेल्या चकमकीत पाकिस्तानी दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं होतं. तीन दहशतवाद्यांचा एक गट शोपियांकडे सीमा ओलांडत असताना ही चकमक झाली.

त्यापूर्वी 9 डिसेंबर रोजीही जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये सकाळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. सुरक्षा दलाला टिकेन गावात तीन दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलं. सर्च ऑपरेशनदरम्यान, दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलावर फायरिंग करण्यात आली होती. अनेक तासांनंतर तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश मिळालं होतं.

Published by: Karishma Bhurke
First published: December 22, 2020, 8:29 AM IST

ताज्या बातम्या