भारतीय लष्कराने केला पाकिस्तानचा पर्दाफाश, ISIच्या  खबऱ्यांचं हे आहे मुंबई कनेक्शन

भारतीय लष्कराने केला पाकिस्तानचा पर्दाफाश, ISIच्या  खबऱ्यांचं हे आहे मुंबई कनेक्शन

हे ISI एजंट खोटी माहिती सांगून लष्करातल्या लोकांशी संपर्क साधत त्यांच्या हालचाली जाणून घेण्याचा प्रयत्न करत होते. या खबऱ्यांना ISI लष्करी जवानांचे नंबर्स पुरवित असे.

  • Share this:

नवी दिल्ली 1 जून: भारतीय लष्कराने पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISIचा एक मोठा कट उधळून लावला आहे. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून एका आरोपीचं मुंबई कनेक्शन उघड झालं आहे. ISI आपल्या एजंट्सच्या माध्यमातून भारतीय लष्कराच्या हालचालींची गुप्त माहिती मिळवत होते. याचा सुगावा लागल्यानंतर आयबी आणि लष्कराच्या गुप्तचर विभागाने सापळा रचून दोन एजंट्सना अटक केली त्यांच्या चौकशीतून खळबळजनक माहिती उघड झाली आहे.

हे ISI एजंट खोटी माहिती सांगून लष्करातल्या लोकांशी संपर्क साधत त्यांच्या हालचाली जाणून घेण्याचा प्रयत्न करत होते. या खबऱ्यांना ISI लष्करी जवानांचे नंबर्स पुरवित असे. खोटी माहिती सांगून ते जवानांकडून त्यांच्या हालचाली, प्रवास, नियुक्त्या आणि इतर गोष्टी जाणून घेत असत. अशा प्रकारचं संभाषणच लष्कराने रेकॉर्ड केलं आहे.

यातला एक आरोपी मुंबईत बसून पाकिस्तानातून येणारे फोन हे एका मशिनच्या माध्यमातून काश्मीर आणि लष्करी अस्थापनांमध्ये फॉरवर्ड करत असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.

त्याच बरोबर या खबऱ्यांनी ISI कशा प्रकारे भारतातून गुप्त माहिती काढण्याचा प्रयत्न करत आहे याची खळबळजनक माहितीही चौकशी करणाऱ्यांना अधिकाऱ्यांना दिली असून त्यामुळे पाकिस्तानचा मोठा कट उधळला गेला आहे.

हे वाचा -

लॉकडाउनमध्ये सूट देणे किती फायदेशीर? धक्कादायक माहिती आली समोर

कोरोना योद्धांसाठी 'आयुष'ची औषधी ढाल; व्हायरसपासून करणार बचाव

आर्मी कँटीनमध्ये स्वदेशीचा डंका; परदेशी सामानांविरोधातही हल्लाबोल

First published: June 1, 2020, 5:54 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading