पाकिस्तानकडून गोळीबार; दोन जवान शहीद तर एक नागरिक ठार!

पाकिस्तानकडून गोळीबार; दोन जवान शहीद तर एक नागरिक ठार!

पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे.

  • Share this:

जम्मू, 20 ऑक्टोबर: पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. जम्मू-काश्मीरमधील तंगधार सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून काल (शनिवारी) रात्री झालेल्या गोळीबारात दोन भारतीय जवान शहीद झाले आहेत. पाकिस्तानकडून झालेल्या या गोळीबाराला भारताने देखील चोख उत्तर दिले. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तान सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आहे. मोदी सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष अधिकार देणारे कलम 370 रद्द केल्यानंतर पाकने सीमेपलिकडून गोळीबार करण्याचे प्रमाण वाढवले आहे.

पाकिस्तानकडून शनिवारी रात्री झालेल्या गोळीबारात दोन जवान शहीद झाले आहेत. या गोळीबारात एक नागरिक देखील ठार झाला असून अन्य तिघे जण जखमी झाले आहेत.

सध्या मिळालेल्या माहितीनुसार काश्मीर खोऱ्यातील कुपवाडा जिल्ह्यातील तंगधार सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला. हा गोळीबार दहशतवाद्यांना घुसखोरी करता यावी यासाठी करण्यात आला होता. पाकिस्तानकडून झालेल्या या गोळीबारात दोन भारतीय जवान शहीद झाले.

स्थानिक मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार पाकिस्तानकडून झालेल्या या गोळीबारामुळे अनेक घरांचे देखील नुकसान झाले आहे. भारतीय जवान पाकिस्तानला चोख उत्तर देत आहेत. याआधी अशाच प्रकारे पाकिस्तानकडून बारामुल्ला येथे झालेल्या गोळीबारात एक जवान शहीद झाला होता.

गेल्याच आठवड्यात बुधवारी अनंतनाग जिल्ह्यात सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले होते. यातील एक जण अनंतनाग जिल्ह्यातीलच होता. नसीर गुजजार छद्रू उर्फ अबु हन्नान असे त्याचे नाव होते. तर जाहिद अहमद लोन आणि आकिब अहमद हजाम अशी अन्य दोघांची नावे आहेत. हे सर्व जण गेल्यावर्षी लष्कर-ए-तोयबामध्ये दाखल झाले होते.

Published by: Akshay Shitole
First published: October 20, 2019, 9:45 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading