जम्मू काश्मीरमध्ये अपघात, हवाई दलाच्या दोन जवानांचा मृत्यू

जम्मू काश्मीरमध्ये अपघात, हवाई दलाच्या दोन जवानांचा मृत्यू

अवंतीपोरा येथे गाडीला अपघात झाल्याने हवाई दलाच्या दोन जवानांचा मृत्यू झाला.

  • Share this:

श्रीनगर, 04 एप्रिल : जम्मू काश्मीरमधील अवंतीपोरा येथे एका दुर्घटनेत हवाई दलाच्या दोन जवानांचा मृत्यू झाल्याची माहिती समजते. हवाई दलाचे अधिकारी या दुर्घटनेमागच्या कारणाचा शोध घेत आहेत. आतापर्यंत ही दुर्घटना कशी झाली याची माहिती मिळू शकली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार जम्मू काश्मीरमधील अवंतीपोरा येथे गुरुवारी सकाळी भारताच्या हवाई दलाचे दोन जवान एका गाडीने जात होते. त्यावेळ गाडीचा अपघात झाला आणि त्यात दोन्ही जवानांचा मृत्यू झाला.

दुर्घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिस आणि हवाई दलाचे अधिकारी पोहचले. त्यांनी जवानांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत. सध्या हवाई दलाच्या अधिकाऱ्यांकडून या अपघाताचे कारण शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अद्याप या अपघाताचे कारण समोर आलेलं नाही.

VIDEO : 'हमारे पास मोदीजी है', मुख्यमंत्र्यांची हिंदीतून टोलेबाजी

First published: April 4, 2019, 5:16 PM IST

ताज्या बातम्या