28 जुलै : 2000 च्या नोटा बंद होतील अशा अफवांना पेव फुटला होता मात्र केंद्र सरकारने 2000 च्या चलनात कायम राहणार आहे असं स्पष्ट केलंय. अर्थ राज्यमंत्री संतोष कुमार गंगवार यांनी याबद्दल माहिती दिली.
2000 च्या नोटा बंद करण्याचा सरकारचा असा कोणताही निर्णय नाही. या नोटांची छपाई कमी करायची ही वेगळी बाब आहे. याबद्दल आरबीआय चौकशी करेल आणि 2000 च्या नोटांचा निर्णय़ही घेईल असं गंगवार यांनी सांगितलं.
तसंच 200 च्या नोटांची छपाई गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. लवकरच त्या चलनातही येतील. 200 च्या नोटा चलनात आणून कमी मुल्याच्या चलनाची यापुढे वाढ होईल असंही गंगवार यांनी सांगितलं.
गेल्या काही दिवसांपासून सरकारने 2000 च्या नोटांची छपाई थांबवली आहे अशी चर्चा सुरू होती. नोटा छपाईवर संसदेतही चर्चा झाली. विरोधकांनी 2000 च्या नोटांची छपाई बंद केली का ? असा सवाल अर्थमंत्री अरूण जेटलींना केला होता. मात्र त्यावेळी जेटलींनी उत्तर दिलं नव्हतं.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा