2 जी स्पेक्ट्रम घोटाळा कधी झालाच नाही! -पी.चिदंबरम

आज 2जी स्पेक्ट्रम घोटाळ्यात सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता दिल्लीच्या पतियाळा हाऊस कोर्टाने केली आहे.

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Dec 21, 2017 12:01 PM IST

2 जी स्पेक्ट्रम घोटाळा कधी झालाच नाही! -पी.चिदंबरम

21 डिसेंबर : 2 जी स्पेक्ट्रम घोटाळा कधी  झालाच नाही   अशी प्रतिक्रिया  माजी अर्थमंत्री आणि काँग्रेस नेते पी चिंदबरम  यांनी दिली आहे. आज 2जी स्पेक्ट्रम घोटाळ्यात सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता दिल्लीच्या पतियाळा हाऊस कोर्टाने केली आहे.

2011 साली 2जी स्पेक्ट्रम घोटाळा  उघडकीस आला होता.  यामध्ये 1 लाख 76 हजार कोटींचा घोटाळा  झाल्याचा आरोप करण्यात आला होता. या घोटाळ्यामुळे तत्कालीन आघाडी सरकारवर झाली होती. त्याचे परिणाम 2014च्या लोकसभा आणि 2011च्या तामिळ नाडूच्या निवडणुकांमध्ये  परिणाम भोगावे लागले होते. याप्रकरणी भाजपने देशाची माफी मागावी अशी मागणी काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी केली आहे.तर या प्रकरणी  आपल्या बाजूने उभ्या राहणाऱ्या सर्वांना कनिमोळीने धन्यवाद दिले आहेत. निकाल आल्यानंतर  द्रमुकच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

या निकालाविरूद्ध सीबीआय आता हायकोर्टात जाणार आहे. स्पेक्ट्रमचे हक्क अनियमितपणे विकल्याचा आरोप या घोटाळ्यात करण्यात आला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 21, 2017 11:30 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...