मराठी बातम्या /बातम्या /देश /

Farmers Protest: आंदोलनात अखेर उभी फूट, भारतीय किसान युनियनच्या टिकैत यांच्यावर गंभीर आरोप

Farmers Protest: आंदोलनात अखेर उभी फूट, भारतीय किसान युनियनच्या टिकैत यांच्यावर गंभीर आरोप

प्रजासत्ताक दिनादिवशी (Republic Day) निघालेल्या ट्रॅक्टर रॅलीमधील (Tractor Rally)हिंसाचारानंतर आता या आंदोलनात फूट पडली आहे. 2 संघटनांनी या आंदोलनातून काढता पाय घेतला आहे.

  • Published by:  Kiran Pharate
नवी दिल्ली 27 जानेवारी : प्रजासत्ताक दिनाला (Republic Day Violence) राजधानी दिल्लीत (Delhi) निघालेल्या ट्रॅक्टर रॅलीमधील (Tractor Rally) हिंसाचारानंतर आता शेतकरी आंदोलनात (farmer protest) फूट पडली आहे. राष्ट्रीय किसान मजदूर संघटनेचे नेते व्ही.एम सिंग (VM Singh) यांनी भारतीय किसान युनियनच्या राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सोबतच त्यांनी या आंदोलनातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. व्ही.एम सिंग  म्हणाले, की आम्ही आमचं आंदोलन इथेच थांबवत असून आमची संघटना आता या आंदोलनात सहभागी नाही. तर, दुसरीकडे भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष भानू प्रताप सिंग यांनीदेखील या आंदोलनातून बाहेर पडत असल्याचं जाहीर केलं आहे. ते म्हणाले, की मंगळवारी दिल्लीत झालेल्या प्रकारामुळे मी अत्यंत दुःखी झालो असून आत्ताच या आंदोलनातून बाहेर पडत असल्याची घोषणा करतो. व्ही.एम सिंग यांचे टिकैत यांच्यावर गंभीर आरोप - व्ही.एम सिंग म्हणाले, की जे साथीदार या आंदोलनातून माघार घेऊ इच्छितात त्यांनी मागे हटावे. या स्वरुपाच्या आंदोलनाला मी साथ देऊ शकत नाही. आम्ही येथे शहीद करायला किंवा आमच्या लोकांना मार बसावा म्हणून घेऊन आलो नाही. अशा लोकांसोबत आम्ही आंदोलन करु शकत नाही, ज्यांची दिशाच वेगळी आहे. राकेश टिकैत एकदाही धानाबद्दल किंवा ऊस उत्पादकांबद्दल बोलले नाहीत. आम्ही पाठिंबा दिला आणि दुसरीकडे इतर लोक नेता बनत राहिले, हे आम्हाला मान्य नाही. व्ही.एम सिंग यांना मोर्चानंच स्वतःपासून वेगळं ठेवलं - मोर्चा यावर संयुक्त किसान मोर्चाच्या एका प्रमुख नेत्यानं म्हटलं, की व्ही.एम सिंग काय या आंदोलनातून वेगळं होतील. त्यांना तर सुरूवातीपासून मोर्चानेच स्वतःपासून वेगळं ठेवलं आहे. आंदोलनाला कमजोर माणूस मध्येच सोडत असतो - टिकैत स्वतःवर लागलेल्या या आरोपांनंतर राकेश टिकैत यांनी म्हटलं, की 'मी आधीच शेतकऱ्यांची संपूर्ण जबाबदारी घेतली आहे. ज्यांना गाजीपूर सोडायचं होतं, त्यांनी आधीच का नाही सोडलं. 2 महिने ते इथे का थांबले होते? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. पोलिसांची लाठी पडली की पळून गेले', अशा शब्दात टिकैत यांनी टीका केली आहे. नेतागिरी करायची होती तेव्हा थांबले आणि एफआयआर दाखल होताच पळून गेले. आंदोलनला नेहमी कमजोर माणूसच मधून सोडून जातो, असा टोलाही त्यांनी लगावला.
First published:

Tags: Delhi, Farmer protest

पुढील बातम्या