भोपाळ, 06 मे : देशात सध्या कोरोनाचा (Coronavirus) वाढता प्रसार थांबवण्यासाठी लॉकडाऊनचा तिसरा टप्पा लागू करण्यात आला आहे. या रोगावर मात करण्यासाठी सर्व देश लस शोधण्यात व्यस्त आहेत. अशात इंजिनिअरिंगच्या (Engineering students) विद्यार्थ्यांनी अँटी सी 19 स्मार्ट बँड तयार केला आहे. अँटी सी 19 बँड स्मार्ट (Anti-C19 Band Smart Watch) घड्याळाप्रमाणे काम करेल. या बँडची खास वैशिष्ट्य म्हणजे जेव्हा एखादा संसर्गग्रस्त व्यक्ती निरोगी व्यक्तीच्या संपर्कात येईल तेव्हा या बँडमधून सतर्क राहण्याचा मेसेज येईल.
याचा सगळ्यात जास्त फायदा अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यांना होणार आहे. यामुळे डॉक्टर, नर्स आणि पोलीस जेव्हा ते रेड झोनमध्ये जातात तेव्हा त्यांना याची मदत होईल. अँटी-सी 19 बँड स्मार्ट वॉच प्रमाणे मोबाईल अॅप्लिकेशनशी कनेक्ट होईल.
आपलं रक्षण करणाऱ्या पोलिसाला 6 तरुणांनी केली बेदम मारहाण, घटना CCTVमध्ये कैद
इंजिनिअरिंगचे विद्यार्थी मयंक आणि विश्वजित यांचं म्हणणं आहे की, हा अँटी सी 19 बॅण्ड सार्वजनिक आरोग्य सेवा आणि देखरेखीसाठी काम करेल. स्मार्ट फिटनेस बँडसारखे दिसणारे बँड मोबाईल अॅप्लिकेशन्सद्वारे कनेक्ट करण्यात सक्षम राहतील. बँडच्या मदतीने एखाद्या संक्रमित व्यक्तीचा निरोगी व्यक्तीशी संपर्क झाला तर निरोगी व्यक्तीसाठी हा सतर्क मेसेज देईल.
डॉक्टर, परिचारिका आणि पोलीस हा बॅन्ड परिधान केल्यानंतर कोणत्याही क्षेत्रात जाऊ शकतात. त्यानंतर या बँडच्या मदतीनं या सर्वांचा रिेअल टाईम डाटा म्हणजे हृदयाचे ठोके, तपमान आणि श्वासोच्छवासाचा दर देखील त्वरित कळू शकेल. या बँडला सर्व्हरशी जोडण्याचं कामसुद्धा सुरू आहे, जेणेकरून सगळ्यांचा रीअल टाइम डेटा घेतला जाऊ शकेल.
मालेगावमध्ये कोरोनावर मात करण्यासाठी आला नवा सिंगम, शासनानं उचललं मोठं पाऊल
क्वारंटाईन लोकांचं केलं जाईल परीक्षण
विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की, कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आणि क्वारंटाईन ठेवलेल्या लोकांवर अँटी सी 19 बँडद्वारे परीक्षण केलं जाईल. यापूर्वी वेगवेगळ्या लोकांच्या पळून गेल्याबद्दल तक्रारी आल्या होत्या. अशा परिस्थितीत त्यांचा मागोवा घेण्यासाठी या बँडमध्ये जीपीएसपी बसवण्यात आलं आहे.