मराठी बातम्या /बातम्या /देश /Corona Virus: कोविड-19 च्या उपचारासाठी WHO कडून 'या' औषधांची शिफारस, होईल फायदा

Corona Virus: कोविड-19 च्या उपचारासाठी WHO कडून 'या' औषधांची शिफारस, होईल फायदा

Corona Virus: गंभीर स्वरूपात आजारी रुग्णांवरील उपचारासाठी कॉर्टिकोस्ट्रॉइड्स यासह बारिसिटिनिब या औषधांचा वापर केला जाऊ शकतो.

Corona Virus: गंभीर स्वरूपात आजारी रुग्णांवरील उपचारासाठी कॉर्टिकोस्ट्रॉइड्स यासह बारिसिटिनिब या औषधांचा वापर केला जाऊ शकतो.

Corona Virus: गंभीर स्वरूपात आजारी रुग्णांवरील उपचारासाठी कॉर्टिकोस्ट्रॉइड्स यासह बारिसिटिनिब या औषधांचा वापर केला जाऊ शकतो.

नवी दिल्ली, 15 जानेवारी: कोरोनाच्या ओमायक्रॉन या नव्या व्हेरिएंटच्या नव्या केसेस वाढत (Omicron cases in India)  असल्याच्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोविड-19 च्या उपचारासाठी दोन नव्या औषधांची शिफारस केली आहे. बारिसिटिनिब आणि कासिरिविमॅब-इमदिविमॅब अशी या औषधांची नावे आहेत. पियर रिव्ह्यू जर्नल बीएमजेमधील हेल्थ बॉडीचे एक्सपर्ट यांनी सांगितलं की, गंभीर स्वरूपात आजारी रुग्णांवरील उपचारासाठी कॉर्टिकोस्ट्रॉइड्स यासह बारिसिटिनिब या औषधांचा वापर केला जाऊ शकतो. साधारणतः या औषधांचा वापर आर्थरायटीसवर उपचारासाठी केला जातो.

WHO च्या माहितीनुसार, हे औषध व्हेंटिलेटरची आवश्यकता कमी करतं. तसंच कोणताही साइड इफेक्ट न होता रुग्णाच्या जिवाची जोखीम कमी करू शकतं. इंटरल्यूकिन-6 (IL 6) या अर्थरायटिसच्या आणखी एका औषधासमान हे औषध आहे. जर तुमच्याकडे दोन्ही औषधांचा पर्याय उपलब्ध असेल तर, किंमत, उपलब्धता आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषध खरेदी कारावं. एकाच वेळी दोन्ही औषधे घेण्याची चूक कधीही करू नये.

Coronavirus: ब्रिटनमध्ये ओमायक्रॉनच्या नव्या स्ट्रेनची दहशत, WHO नं सांगितलं किती धोकादायक

कोणत्या रुग्णांना देऊ शकतो औषध?

WHO च्या गाइडलाइननुसार, सध्याची परिस्थिती पाहून मोनोक्लोनल अँटिबॉडी सोट्रोविमॅब या औषधाचा वापर करण्याची शिफारस केली आहे. हे औषध कमी गंभीर असलेल्या परंतु हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची जास्त जोखीम असलेल्या रुग्णांना दिले जाऊ शकते. कॅसिरिविमॅब-इमदिविमॅब हे आणखी एक मोनोक्लोनल अँटिबॉडी औषध वापरण्याची शिफारस WHO नं केली आहे.

WHO नं जारी केलेल्या एका निवेदनानुसार, मोनोक्लोनल अँटिबॉडीवरील उपचाराच्या शिफारसीसाठी पुरेसा डेटा उपलब्ध नव्हता. ओमायक्रॉनसारख्या नव्या व्हेरिएंटविरुद्ध याच्या परिणामकारकतेची पुरेशी माहिती सध्या उपलब्ध नाही, ही शिफारस WHOनं स्वीकारली आहे. मोनोक्लोनल अँटिबॉडीचा पुरेसा डेटा उपलब्ध झाल्यानंतर त्याच्या गाइडलाइन नंतर जारी केल्या जातील.

या आधारावरून काढला निष्कर्ष

चार हजार सामान्य, कमी गंभीर आणि जास्त गंभीर संक्रमित रुग्णांवर झालेल्या परीक्षणाच्या निष्कर्षांच्या आधारावरून WHO नं या शिफारशी केल्या आहेत. हे सर्व रुग्ण WHO नं मॅथोडोलॉजिकल सपोर्ट ऑफ मॅजिक एव्हिडन्स इकोसिस्टिम फाउंडेशनसोबत मिळून विकसित केलेल्या लिव्हिंग गाइडलाइनचा भाग आहेत.  जेणेकरून कोविड-19 मॅनेजमेंटसाठी विश्वासार्ह दिशानिर्देश दिले जाऊ शकतील, तसंच रुग्णांवर उपचार करण्यासाठी डॉक्टर्ससुद्धा चांगले निर्णय घेऊ शकतील.

First published:
top videos

    Tags: Corona, Corona virus in india, Coronavirus