• Home
  • »
  • News
  • »
  • national
  • »
  • जम्मू एअरबेसवर दोन ड्रोन हल्ले, सहाव्या मिनिटाला दुसऱ्या स्फोटानं हादरलं विमानतळ

जम्मू एअरबेसवर दोन ड्रोन हल्ले, सहाव्या मिनिटाला दुसऱ्या स्फोटानं हादरलं विमानतळ

Jammu Air Base Explosions: 5 मिनिटांच्या फरकानं येथे दोन स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे. पहिला स्फोट एका इमारतीच्या गच्चीवर झाला तर दुसरा स्फोट जमिनीवर झाला.

  • Share this:
    श्रीनगर, 27 जून: जम्मू (Jammu airport) विमानतळावर दोन स्फोट झाले आहेत विमानतळाच्या एअरफोर्स स्टेशनवर(Explosion)हे स्फोट झाल्याची माहिती मिळतेय. 5 मिनिटांच्या फरकानं येथे दोन स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे. (Jammu air base) पहिला स्फोट एका इमारतीच्या गच्चीवर झाला तर दुसरा स्फोट जमिनीवर झाला. धक्कादायक म्हणजे जम्मू एअरबेसवर स्फोट घडवण्यासाठी दोन (Two drones) ड्रोनचा वापर करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. एनआयए या वृत्तसंस्थेनं या संदर्भातलं वृत्त दिलं आहे. एनआयएची टीमही जम्मू एअरपोर्टवर दाखल झाली आहे. IED टाकण्यासाठी ड्रोनचा वापर केला असून यात दोन बॅरेक्सचं नुकसान झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. पाच मिनिटात दोन स्फोट झालेत आहेत. यातला पहिला स्फोट रात्री 1:37 वाजता आणि दुसरा 1:42 वाजता झाला आहे. 5 मिनिटांच्या फरकानं येथे दोन स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे. पहिला स्फोट एका इमारतीच्या गच्चीवर झाला तर दुसरा स्फोट जमिनीवर झाला. यानंतर काही मिनिटांतच संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. पोलीस, फॉरेन्सिक टीम आणि वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झालेत. बॉम्ब डिस्पोजल स्क्वॉडही घटनास्थळी उपस्थित आहे. एअरफोर्सनं या स्फोटात कोणीही जखमी झाल्याचं अधिकृत वृत्त दिलं नाही आहे. मात्र दोन जण या स्फोटात जखमी झाल्याची माहिती पोलीस आणि आयबी यांनी दिली आहे. मात्र जखमी झालेल्याची प्रकृती स्थिर असल्याचंही सुत्रांकडून समजतंय.
    Published by:Pooja Vichare
    First published: