Home /News /national /

आईच्या मृत्यूनंतर काहीच तासात कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी दाखल, या डॉक्टरांच्या कार्याला सलाम!

आईच्या मृत्यूनंतर काहीच तासात कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी दाखल, या डॉक्टरांच्या कार्याला सलाम!

'कर्मचारी सखी' साधतात महिला रुग्णांशी संवाद

'कर्मचारी सखी' साधतात महिला रुग्णांशी संवाद

देशातील कोरोनाची परिस्थिती (Corona in India) आणखी बिकट होत चालली आहे. या कठीण काळात डॉक्टरांचे कार्य अतिशय महत्त्वाचे आहे. अनेक ठिकाणी फार तत्परतेने रुग्णांवर इलाज करताना त्यांची काळजी घेताना दिसत आहेत. गुजरातमधून अशाच दोन डॉक्टरांची प्रेरणादायी कहाणी समोर आली आहे.

पुढे वाचा ...
    बडोदा, 20 एप्रिल : देशातील कोरोनाची परिस्थिती (Corona in India) आणखी बिकट होत चालली आहे. या कठीण काळात डॉक्टरांचे कार्य अतिशय महत्त्वाचे आहे. अनेक ठिकाणी फार तत्परतेने रुग्णांवर इलाज करताना त्यांची काळजी घेताना दिसत आहेत. गुजरातमधील (Gujarat Corona Situation) अशाच दोन डॉक्टरांची प्रेरणादायी कहाणी समोर आली आहे. त्यातील एक म्हणजे कोव्हिड व्यवस्थापनाचे नोडल अधिकारी डॉ. राहुल परमार आणि दुसऱ्या त्यांच्या सहकारी शिल्पा पटेल, असोसिएट प्रोफेसर. दोघेही गुजरातच्या बडोदा येथील सयाजी रुग्णालयामध्ये तैनात आहेत. दोघांच्याही आईचे निधन झाले होते. त्यांच्या अंत्यसंस्कारानंतर दोघेही आपापल्या कर्तव्यावर लगेच हजर झाले. या काळात कोरोना रुग्णांना त्यांची फार गरज असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. आमचे काम खूप जबाबदारीचे.. सयाजी रुग्णालयातील (Sayaji Hospital) कोव्हिड व्यवस्थापनाचे नोडल अधिकारी डॉ. राहुल परमार यांची आई कांता यांचे गुरुवारी गांधीनगर येथे निधन झाले. त्या 67 वर्षांच्या होत्या. हे कळताच राहुल गांधीनगर येथे पोहोचले आणि आईच्या अंत्यसंस्काराचा कार्यक्रम पूर्ण केला. मात्र, दुसर्‍याच दिवशी शुक्रवारी सकाळी पुन्हा ते कर्तव्यावर परत दाखल झाले. (हे वाचा-Corona फोफावतोय! भारताला या विळख्यातून बाहेर काढू शकतील फील्ड हॉस्पिटल्स) राहुल म्हणाले की, सध्या माझे कामावर असणे खूप गरजेचे आहे. उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या रूग्णांविषयी कुटुंबीयांना माहिती देणे आणि कागदपत्रे पूर्ण करून मृतदेह त्यांच्या स्वाधीन करणे माझे काम आहे. याक्षणी अशी परिस्थिती पाहता, मला रुग्णालयात राहणे फार महत्त्वाचे आहे. डिसेंबरमध्ये राहुल यांनाही कोरोनाची लागण झाली होती. पहाटे आईचे निधन आणि त्या सकाळी 9 वाजता कामावर हजर तसेच कोव्हिड काळात ड्युटीवर असताना रुग्णालयाच्या शरीरशास्त्र विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. शिल्पा पटेल यांच्या आईचेही गुरुवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास निधन झाले. आईच्या अंत्यसंस्कारानंतर अवघ्या 6 तासांनी सकाळी 9 वाजता त्या रुग्णालयात कामावर परत आल्या. (हे वाचा-कोरोनाग्रस्त पेशंटला हाय फ्लो ऑक्सिजनची गरज का आणि केव्हा भासते? जाणून घ्या) शुक्रवारी सायंकाळी सयाजी रुग्णालयात झालेल्या आढावा बैठकीत कोव्हिड कक्षाचे अधिकारी डॉ. विनोद राव यांना दोघांची माहिती मिळाली. यावर ते म्हणाले की, या दोघांनी इतरांसमोर कामाप्रती समर्पण काय असते, याचे उदाहरण ठेवले आहे. मी दोन्ही कोरोना वॉरियर्सला सलाम करतो. हा काळ खूप कठीण आहे आणि कुटुंब आणि नातेवाईक विसरून डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी आपले कर्तव्य बजावत आहेत. बडोदा हा गुजरातमधील चौथा सर्वाधिक बाधित जिल्हा गुजरातमध्ये सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचं थैमान सुरू आहे. आतापर्यंत याठिकाणी 4 लाखांहून अधिक बाधितांची नोंद झाली आहे. रविवारी एका दिवसात सर्वाधिक 10,340 बाधितांची नोंद झाली. कोरोनामुळे राज्यात 5,377 लोकांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे, लसीचे आतापर्यंत एक कोटीपेक्षा जास्त मात्रा देण्यात आल्या आहेत. बडोदा हा राज्यातील चौथा सर्वाधिक बाधित जिल्हा आहे. येथे 41 हजाराहून अधिक लोकांना संसर्ग झाला आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Corona, Corona hotspot, Corona spread

    पुढील बातम्या