• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • भयंकर अपघात! पंक्चर झालेल्या ट्रकचा जॅक निसटला, महिलेसह दोघांचा चिरडून मृत्यू

भयंकर अपघात! पंक्चर झालेल्या ट्रकचा जॅक निसटला, महिलेसह दोघांचा चिरडून मृत्यू

पंक्चर झालेल्या ट्रकचा जॅक (two died in truck accident including a woman) निसटल्यामुळे त्याखाली सापडून दोघांचा मृत्यू झाल्याची भयंकर दुर्घटना समोर आली आहे.

 • Share this:
  मंडी, 10 नोव्हेंबर: पंक्चर झालेल्या ट्रकचा जॅक (two died in truck accident including a woman) निसटल्यामुळे त्याखाली सापडून दोघांचा मृत्यू झाल्याची भयंकर दुर्घटना समोर आली आहे. ट्रक पंक्चर झाल्यामुळे नेहमीप्रमाणे चालकाने रस्त्याच्या कडेला (Truck tire punctured) उभा केला होता. त्याला जॅक लावून पंक्चर काढण्याचं काम सुरू होतं. मात्र अचानक (2 died in an accident) जॅक निसटल्यामुळे काही कळायच्या आता त्याने दोघांचा बळी घेतला. अशी घडली दुर्घटना हिमाचल प्रदेशातील मंडी परिसरात होशियारपूरवरून आलेला एक ट्रक विटा वाहून नेत होता. बही नावाच्या गावापाशी त्याचं टायर पंक्चर झालं. त्यामुळे चालकानं ट्रक रस्त्याच्या कडेला लावून पंक्चर काढायला सुरुवात केली. त्यासाठी ट्रकला जॅक लावून तो चाक बदलण्याचं काम करत होता. मात्र तेवढ्यात हा जॅक निसटला आणि ट्रक चालू लागला. ट्रक उतारावर असल्यामुळे त्याने वेग घेतला आणि तो पुढे पुढे जाऊ लागला. याचवेळी गावातील 55 वर्षीय ब्रम्ही देवी या कामावर जाण्यासाठी निघाल्या होत्या. बसची वाट पाहत त्या रस्त्यावर उभ्या होत्या. यावेळी विरुद्ध दिशेने आपल्याकडे चालत येणाऱ्या ट्रककडे त्यांचं लक्षच गेलं नाही. किंबहूना, हा ट्रक पंक्चर असेल आणि त्यामुळे अपघात होऊ शकतो, याची त्यांना कल्पनाही आली नसावी, असा अंदाज बांधला जात आहे. पुढच्याच क्षणी हा ट्रक त्यांच्या अंगावर आला आणि त्याखाली सापडून त्यांचा जागीच मृत्यू झाला. पंक्चर काढत असलेल्या ट्रकच्या चालकाचाही या घटनेत मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. हे वाचा- क्रूरतेचा कळस! सळईने मारहाण केल्याने श्वानाचा मृत्यू,पुण्यातील मन हेलावणारी घटना पोलीस तपास सुरू दोघांचा बळी गेल्यानंतर हा ट्रक सरळ काही अंतर चालत गेला आणि त्यानंतर रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाला. पोलिसांनी ट्रकचा चालक राकेश कुमार आणि ब्रम्ही देवी यांचे मृतदेह ताब्यात घेऊन ते पोस्टमॉर्टेमसाठी पाठवले आहेत. एका किरकोळ कारणामुळे दोन व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला आहे. परिसरात या घटनेबाबत हळहळ व्यक्त केली जात आहे.
  Published by:desk news
  First published: