Home /News /national /

लॉकडाऊन असतानाच जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला, 2 जवान शहीद

लॉकडाऊन असतानाच जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला, 2 जवान शहीद

'भारत जगभर औषधं पाठवतो आहे तर पाकिस्तान दहशतवाद निर्यात करण्याचं धोरण सोडायला तयार नाही.'

  श्रीनगर 19 एप्रिल: देशभर लॉकडाऊन असल्यामुळे सगळे व्यवहार ठप्प आहेत. जम्मू आणि काश्मीरमध्येही सगळे व्यवहार ठप्प असून वाहतूकही बंद आहे. अशा वातावरणातही दहशतवादी सुरक्षा दलांवर हल्ले करत आहेत. सोपोर आणि बारामुल्ला जिल्ह्यात दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या पथकांवर हल्ले केले. यात  CRPFचे 2 जवान शहीद झाले आहेत. तर एक जवान जखमी झाला. लष्कर प्रमुख मनोद नरवणे यांनी नुकतीच राज्यातल्या महत्त्वाच्या भागांना भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी पाकिस्तानवर टीकाही केली होती. जग कोरोनाविरुद्ध लढत आहे. भारत जगभर औषधं पाठवतो आहे तर पाकिस्तान दहशतवाद निर्यात करण्याचं धोरण सोडायला तयार नाही असं मत त्यांनी व्यक्त केलं होतं. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जैश-ए-मोहम्मदचे अनेक दहशतवादी कोरोना विषाणूच्या संसर्गाचे बळी ठरले आहेत. या दहशतवाद्यांनी पाकिस्तान सरकारकडे उपचारासाठी मदत मागितली आहे, परंतु त्यांच्यावर पाकिस्तान सरकारने उपचार करण्यास नकार दिला. त्यामुळे काश्मीरहून पाकिस्तानला गेलेले अनेक दहशतवादी पुन्हा एकदा काश्मीरला परतण्याच्या मनस्थितीत आहेत. राष्ट्रपती भवन परिसरात राहणाऱ्या कर्मचाऱ्याच्या नातेवाईकाचा कोरोनामु मुत्यू मिळालेल्या माहितीनुसार, शाहिद या लाहोरमध्ये राहणाऱ्या दहशतवाद्याने अनंतनागमध्ये राहणार्‍या त्याच्या कुटुंबातील लोकांना दूरध्वनी करून सांगितले आहे की, तो स्वतः कोरोना व्हायरस संसर्गाचा बळी ठरला आहे. वडिलांशी बोलताना शाहिदने असेही सांगितले की, त्याची तब्येत इतकी खालावली आहे की कदाचित हा त्यांचा अखेरचा फोन असेल. शाहिदची प्रकृती दिवसेंदिवस खराब होत आहे.

  COVID 19 : सर्व्हे करणाऱ्या डॉक्टरांच्या पथकावर चाकू हल्ला, एक जखमी

  शाहीद कोरोनावरील उपचारासाठी अनेक सरकारी अधिकाऱ्यांना निरोप पाठविला होता, परंतु पाकिस्तान सरकारने या संदर्भात कोणतीही कार्यवाही केली नाही. जैश दहशतवाद्याने सांगितले की त्याचे साथीदार खूप घाबरले आहेत आणि काश्मीरमध्ये प्रवेश करण्यासाठी तयार आहेत.
  Published by:Priyanka Gawde
  First published:

  पुढील बातम्या