आर्थिक संकटाने घेतला दोन भावांचा बळी; स्वत:च्या ज्वेलर्स शॉपमध्येच घेतला गळफास

आर्थिक संकटाने घेतला दोन भावांचा बळी; स्वत:च्या ज्वेलर्स शॉपमध्येच घेतला गळफास

पोलीस घटनास्थळी आले तेव्हा दोन्ही भावांचे मृतदेह दुकानातील पंख्याला लटकलेले आढळले

  • Share this:

नवी दिल्ली, 26 ऑगस्ट : राजधानी दिल्लीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील चांदनी चौकातील राहणाऱ्या ज्वेलरी व्यवसायातील दोन भावानी गळफास लावून आत्महत्या केली आहे. आत्महत्येचे कारण आर्थिक चणचण असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार दिल्लीतील चांदनी चौकातील मालीवाडामध्ये हल्दीरामच्या वरच्या मजल्यावर कृष्णा ज्वेलर्स नावाचे आदिश्वर गुप्ता यांचं दुकान आहे. त्यांची दोन मुलं अंकित गुप्ता (47), आणि अर्पित गुप्ता (42) याच दुकानातून काम करीत होते. बुधवारी दोन्ही भाऊ दुकानात होते. साधारण 3 वाजता दोन्ही भावांनी दुकानात गळफास घेऊन आत्महत्या केली.

घटनेची माहिती मिळताच संपूर्ण बाजारात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होताच भावांचा मृतदेह खाली उतरवला आणि पंचनाम्याच्या कारवाईनंतर दोघांचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठविण्यात आला. सांगितले जात आहे की दोन्ही भावांना व्यवसायात मोठं नुकसान झालं होतं. दोघेही कर्जात बुडाले होते. यामुळे त्रस्त होत दोघांनी आत्महत्येचं पाऊल उचललं. दोघांनी दुकानात पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर त्यांच्या कुटुंबीयांचा मोठा धक्का बसला आहे. त्यांच्याजवळ मिळालेल्या सुसाईट नोटमधून त्यांच्या आत्महत्येचं कारण समोर आलं आहे.

हे वाचा-तरुणाची निर्घृण हत्या, घरात घुसून चाकूनं केले सपासप वार, नंतर झाडली गोळी

कोरोनामुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांवर आर्थिक संकट कोसळलं आहे. गेल्या तीन ते चार महिन्यात अनेकांना अशा स्वरुपाच घातक पाऊल उचलल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत.

Published by: Meenal Gangurde
First published: August 26, 2020, 9:21 PM IST
Tags: sucide

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading