अवघ्या एका तासात मोदी सरकारला दोन धक्के, एक आनंदाचा दुसरा अडचणीचा

मागील एका तासात देशात दोन मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. यातील एका घटना ही केंद्रातील मोदी सरकारसाठी मोठा धक्का होती.

News18 Lokmat | Updated On: Dec 10, 2018 06:10 PM IST

अवघ्या एका तासात मोदी सरकारला दोन धक्के, एक आनंदाचा दुसरा अडचणीचा

मुंबई, 10 डिसेंबर : मागील एका तासात देशात दोन मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. यातील एका घटना ही केंद्रातील मोदी सरकारसाठी मोठा धक्का होती. ती म्हणजे आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी राजीनामा दिला आहे. पण काही क्षणांतच केंद्र सरकारच्या एका मोठ्या प्रयत्नाला यश आल्याची बातमी येवून धडकली. कर्जबुडव्या विजय माल्ल्याचे भारताला प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झाला आहे.

उर्जित पटेलांचा राजीनामा:

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.उर्जित पटेल यांनी खासगी कारणांसाठी आपण राजीनामा देत असल्याचं स्पष्टीकरण दिलं. राजीनामा दिल्यानंतर त्यांनी आरबीआयच्या कर्मचाऱ्यांचे आभार मानले. परंतु, उर्जित पटेल यांच्या राजीनाम्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

20 आॅगस्ट 2016 रोजी उर्जित पटेल यांनी आरबीआयच्या गव्हर्नरपदाचा कारभार स्विकारला होता. त्यांच्या नियुक्तीनंतर आरबीआय आणि सरकारमध्ये खटके उडाले होते. मध्यंतरी रिझर्व बँक आणि सरकार यांच्यातला तणाव वाढला होता. सरकार RBIला इथून पुढेही सल्ले देत राहील, अशी स्पष्टोक्ती अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केली होती. त्यामुळे हा वाद आणखी पेटला.

मागील महिन्यातच रिझर्व बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल राजीनामा देण्याची शक्यता होती. पण अखेर आज त्यांनी आज राजीनामा दिला.

Loading...

उर्जित पटेल हे रिझर्व बँकेचे २४ वे गव्हर्नर जागतिक स्तरावर नावाजलेले अर्थतज्ज्ञ मानले जातात. इंटरनॅशनल मॉनिटरी फंड (IMF)सारख्या संस्थांसाठीही त्यांनी काम केलं आहे.

खरं तर मोदी सरकारनंच उर्जित पटेल यांची नेमणूक केली होती. माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्या जागेवर पटेल यांची नियुक्ती झाली होती. पण राजन यांचेही मोदी सरकारबरोबर अनेक बाबतीत मतभेद होते आणि ते त्यांनी नंतर जाहीरपणे सांगितले देखील. निश्चलनीकरण आणि नोटाबंदीवरून हे मतभेद होते.

 माल्ल्याचे भारतात प्रत्यार्पण:

भारतातल्या बँकांचं कर्ज बुडवून लंडनमध्ये विलासी जीवन जगतअसलेल्या विजय माल्ल्याला भारताकडे प्रत्यार्पण करण्याचा मोठा निर्णय लंडन कोर्टानं घेतला आहे.  मल्ल्याला भारताला सोपवायचं की नाही याचा निर्णय लंडनचं न्यायालय देणार आहे. विजय मल्ल्याला भारताकडे सोपवावं अशी विनंती केंद्र सरकारने ब्रिटनच्या न्यायालयात केली होती. त्यावर लंडनचं न्यायालय थोड्याच वेळात निकाल देणार आहे. तर कोर्टात जाण्यापूर्वी माल्ल्याने 'माझे सर्व पैसे घ्या पण, मला चोर म्हणू नका' अशी विनंती केली.

न्यायालयाच्या या अपेक्षीत निर्णयाच्या पार्श्वभूमीवर सीबीआय आणि सक्तवसुली संचालनालयाची एक खास टीम लंडनमध्ये दाखल झाली असून, सीबीआयचे संयुक्त संचालक ए. साई मनोहर यांच्या नेतृत्वाखाली हे पथक सर्व घटनांवर लक्ष ठेवून आहे. लंडनचं कोर्टाचा निकाल सकारात्मक आला, तर मल्ल्याला भारतात घेऊन येण्याचं काम ही टीम करणार आहे.

देश सोडून पळून गेलेला मद्याचा व्यावसायिक विजय माल्याला भारतात पाठवण्याच्या निर्णय येण्याच्या चार दिवसांपूर्वी माल्याने सगळं कर्ज फेडण्याची तयारी दाखवली होती. भारतीय बँक आणि सरकारला ट्विट करत माल्याने त्याचा प्रस्ताव मान्य करण्याची विनंती केली आहे. ज्या-ज्या बँकांकडून कर्ज घेतलंय ते सर्व कर्ज मी फेडायला तयार आहे. मात्र, त्यावरचे व्याज मी देऊ शकत नाही असं त्यानं म्हटलं होतं.

सक्त वसुली संचालयाने त्याला मल्ल्याला फरार आरोपी असं म्हटलं होतं. 'फरारी आरोपी' या शब्दामुळे माझ्या प्रतिमेला धक्का लागला आहे. त्यामुळं 'फरारी आरोपी' हा शब्द काढून टाकावा असं मल्ल्याने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करून मागणी केली होती.


VIDEO : कांद्याला 1 रुपया भाव , संतापलेल्या शेतकऱ्याने फुकट वाटले कांदे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 10, 2018 06:10 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...