पत्रकार गौरी लंकेश हत्येप्रकरणी दोन जणांना अटक

पत्रकार गौरी लंकेश हत्येप्रकरणी दोन जणांना अटक

एसआयटी दोघांचीही कसून चौकशी करत आहे. 5 डिसेंबरला ताहीरला ताब्यात घेण्यात आलं होतं.

  • Share this:

08 डिसेंबर : पत्रकार गौरी लंकेश हत्ये प्रकरणी एसआयटीच्या टीमने दोन जणांना अटक केलीये. यामध्ये सुपारी किलर शशीधर आणि त्याला शस्त्र पुरवठा करणारा ताहीर नावाचा व्यक्ती सहभागी आहे. एसआयटी दोघांचीही कसून चौकशी करत आहे. 5 डिसेंबरला ताहीरला ताब्यात घेण्यात आलं होतं.

शशीधर आणि ताहीरकडून 7.65 एम एम बोरची गावठी बंदूक जप्त करण्यात आलीये. अशाच एका बंदुकीतून गौरी लंकेश आणि एम.एस.कलबुर्गी यांची हत्या करण्यात आली होती. आॅगस्ट 2015 मध्ये कलबुर्गी यांची दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. तशाच प्रकारे 5 सप्टेंबरला गौरी लंकेश यांची हत्या करण्यात आली होती.

कर्नाटकचे गृहमंत्री रामलिंगा रेड्डी यांनी या बातमीला दुजोरा दिलाय. गौरा लंकेश यांच्या हत्येप्रकरणी दोन जणांना अटक केली आहे. एसआयटी आणि सीसीबी टीम दोघांची चौकशी करत आहे. आम्ही बॅलेस्टिक रिपोर्टसची वाट पाहतोय तो आल्यानंतर त्यावर निष्कर्ष योग्य तो निष्कर्ष काढला जाईल असंही रेड्डी यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 8, 2017 11:23 PM IST

ताज्या बातम्या