आई – वडिलांनी कर्ज न फेडल्यानं अडीच वर्षाच्या मुलीची हत्या; डोळे काढले

Murder : अडीच वर्षाच्या मुलीची हत्या करून तिचे डोळे काढण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 6, 2019 05:17 PM IST

आई – वडिलांनी कर्ज न फेडल्यानं अडीच वर्षाच्या मुलीची हत्या; डोळे काढले

लखनऊ, 056 जून : आई-वडिलांनी 10 हजाराचं कर्ज न फेडल्यानं अडीच वर्षाच्या मुलीची हत्या करण्यात आली. त्यानंतर तिचे डोळे काढण्यात आल्याच्या धक्कादायक घटनेनं उत्तर प्रदेशमध्ये खळबळ उडाली आहे. मन सुन्न करणारी अशी ही घटना आहे. उत्तर प्रदेशातील अलिगडमध्ये ही घटना घडली आहे. याप्रकरणात पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. पण, मुलीसोबत बलात्कार झाल्याची बातमी मात्र पोलिसांनी फेटाळून लावली आहे. याप्रकरणात 31 मे रोजी अडीच वर्षाच्या मुलीच्या अपहरणाची तक्रार दाखल करण्यात आली होती.

आई – वडिलांवर होतं कर्ज

मुलीच्या आई – वडिलांवर 10 हजार रूपयाचं कर्ज होतं. त्यांना 10 हजाराचं कर्ज फेडता येत नव्हतं. त्यामुळे आरोपींनी अडीच वर्षाच्या मुलीचं अपहरण केलं. या प्रकरणी 31 मे रोजी तक्रार दाखल करण्यात आली होती. वैयक्तिक वादातून मुलीची हत्या करण्यात आल्याचं प्राथमिक तपासातून स्पष्ट झालं आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. त्यांनी आपल्या गुन्ह्याची कबुली देखील दिली आहे.


भडकलेल्या वळूचं भांडण सोडवण्यासाठी केला 'हा' अजब उपाय

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: murder
First Published: Jun 6, 2019 05:14 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...