सुरतमध्ये आयसिसच्या दोन संशयितांना अटक

सुरतमध्ये आयसिसच्या दोन संशयितांना अटक

गुजरात विधानसभा निवडणुकीदरम्यान घातपात घडवण्याचा यांचा कट होता. नंतर हे दोघं परदेशात पळून जाणार होते. पण तो कट एटीएसनं उधळून लावलाय. आयसिसशी ते इंटरनेटच्या माध्यमातून संपर्कात होते

  • Share this:

26 ऑक्टोबर: सुरतमध्ये काल आयसिसच्या २ संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. गुजरात एटीएसनं ही कारवाई केली आहे. कासिम आणि ओबेद अशी त्यांची नावं आहेत.

गुजरात विधानसभा निवडणुकीदरम्यान घातपात घडवण्याचा यांचा कट होता. नंतर हे दोघं परदेशात पळून जाणार होते. पण तो कट एटीएसनं उधळून लावलाय. आयसिसशी ते इंटरनेटच्या माध्यमातून संपर्कात होते. धार्मिक स्थळांवर हल्ला करण्याचा त्यांचा कट होता. त्यासाठी त्यांनी काही ठिकाणांवर रेकीही केली होती. हे दोघंही अब्दुल फाजलमुळे प्रेरित झाले होते.

दरम्यान केरळ पोलिसांनीसुद्धा तीन संशयितांना अटक केली आहे हे तिघंही ऐन विशीतले असून त्यांनी इस्तांबूलला ट्रेनिंग घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हे तिघंही सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे.

एकीकडे आयसिसच्या नवीन दहशतवाद्यांना अटक होत असताना दुसरीकडे 2014 मध्ये कल्याणमधून पळून जाऊन आयसीस जॉइन केलेल्या चार तरुणांपैकी एकाचा फाहद शेख या तरुणाचा मृत्यू झाला आहे. याच्याआधी दोघांचा मृत्यू झालेला आहे. 2014 ची ही पहिली घटना होती, ज्यात भारतातून पळून जाऊन तरुणांनी आयसीस जॉईन केलं होतं. काल फाहदच्या वडिलांना एका अज्ञात नंबरवरून फोन आला होता. तुमच्या मुलाचा सीरियात लढताना मृत्यू झालाय. अंत्यविधी आम्ही लवकरच करू. असं हा इसम फोनवरून म्हणाला. एनआयए आणि एटीएसलाही याबाबत कळवण्यात आलंय.

फाहदच्या वडिलांनी तो नंबर पोलिसांना दिलाय. जेणेकरून मुलाच्या मृत्यूबाबत पोलीसही शहानिशा करू शकतील.

First published: October 26, 2017, 10:14 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading