पाकिस्तान 5 जुलै : सोशल मीडियामुळे आता काहीच लपून राहत नाही आणि कॅमेऱ्याच्या नजरेतून काहीही सुटत नाही. लहान-सहान चुका, विसरभोळेपणा किंवा अज्ञानामुळे सोशल मीडियावर ट्रोल होणं हे आता काही नवं राहिलं नाही. पाकिस्तानातले तर असे अनेक व्हिडीओ नेटवर तुफान व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या नेटकऱ्यांच्या टीकेचं लक्ष ठरलाय. पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेविषयीच्या एका कार्यक्रमात एका अँकरला खायचं Apple आणि जगातली बडी फोन कंपनी असलेल्या Appleमधला फरक कळला नाही आणि तिच्या त्या वेंधळेपणाचं सोशल मीडियावर हसू झालंय.
पाकिस्तानी पत्रकार नायला इनायत यांनीच हा 4 एप्रिलचा व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केलाय. पाकिस्तानच्या एका न्यूज चॅनलवर देशाच्या अर्थव्यवस्थेविषयी चर्चा सुरू होती. विषय समजून सांगताना तज्ज्ञ म्हणाले की Appleची उलाढल ही पाकिस्तानच्या बजेटपेक्षा कितीतरी पट जास्त आहे. त्यावर अँकरने आपलं ज्ञान दाखविण्याचा प्रयत्न केला. ती म्हणली मीही असं ऐकलं की Appleची शेती खूप मोठ्या प्रमाणावर केली जाते.
त्या पाहुण्यांच्या अँकरचा गोंधळ लक्षात आला त्यांनी तीला लगेच सांगितलं की मी खायच्या Apple विषयी बोलत नाहीये तर जगातल्या मोठ्या फोन कंपनी विषयी बोलतोय. त्यावर ते दोघही हसायला लागले. हा चर्चेचा कार्यक्रम आहे की कॉमेडी शो, अँकरने आज आपलं खरं ज्ञान दाखवून दिलं अशा प्रतिक्रियांच्या पाऊसच सोशल मीडियावर आलाय.
Apple business and types of apple, just some regular tv shows in Pakistan.. pic.twitter.com/3Sr7IBl7ns
— Naila Inayat नायला इनायत (@nailainayat) July 4, 2019
पाकिस्तान दिवाळखोर?
पाकिस्तान दिवळखोरीच्या उंबरठ्यावर उभा आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान इम्रान खान यांनी आज देशाला संबोधीत केलं आणि सर्व परिस्थिती सत्य स्थिती लोकांना सांगितली. कर्जाचा प्रचंड बोजा, जवळजवळ ठप्प झालेला विकास, वाढत नसलेला महसूल आणि भ्रष्टाचार यामुळे देश रसातळाला गेल्याचं इम्रान खान यांनी सांगितलं. परिस्थिती पुन्हा सुरळीत करायची असेल तर देशातल्या प्रत्येकाला पुढं आलं पाहिजे असं आवाहनही त्यांनी केलं. किती दिवस पाकिस्तान उधारीवर जगणार असा सवाल त्यांनी लोकांना केला.
इम्रान खान म्हणाले, गेल्या 10 वर्षात पाकिस्तानवरच्या कर्जाचा बोजा 6 हजार अब्ज रुपयांवरून 30 हजार अब्ज पाकिस्तानी रुपयांवर गेलाय. जो महसूल मिळतो त्यातला अर्धा भाग हा कर्जाच्या व्याजाचे हफ्ते चुकविण्यात जातात. तर उरलेले पैसे कर्मचाऱ्यांचे पगार आणि प्रशासनावर खर्च होतात. त्यामुळे देश कसा चालवायचा हा माझ्यासमोर प्रश्न आहे अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
सौदी अरेबिया, चीन आणि युएई या मित्र देशांच्या मदतीवर पाकिस्तानची अर्थव्यवस्था तग धरून आहे. तर जागतिक बँकेनेही पाकिस्तानला नुकतच बेलआऊट पॅकेज दिलंय. त्याचबरोबर अटीही लादल्या आहेत. आर्थिक सुधारणा करणं, भ्रष्टाचाराला आळा घालणं आणि खर्चावर कपात करणं या गोष्टी इम्रान खान यांना कराव्या लागणार आहेत.