राहुल गांधींच्या 'मोदीजी, क्या आपको बिल्कुल भी शर्म नहीं आती?' वरून सुरू झालं ट्विटर वॉर

राहुल गांधींच्या 'मोदीजी, क्या आपको बिल्कुल भी शर्म नहीं आती?' वरून सुरू झालं ट्विटर वॉर

अमेठीच्या शस्त्रास्त्र कारखान्याच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेला दावा खोडून काढत राहुल गांधींनी 'तुम्हाला खोटं बोलताना थोडीशीही लाज वाटत नाही का?’ असा सवाल केला. त्यावर स्मृती इराणींनी काय उत्तर दिलं पाहा...

  • Share this:

नवी दिल्ली, 4 मार्च : अमेठीच्या शस्त्रास्त्र कारखान्याच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेला दावा खोडून काढत राहुल गांधींनी काही सवाल केले आहेत. राहुल गांधींनी हिंदीतून ट्वीट करत पंतप्रधान मोदींना काही प्रश्न विचारले आहेत. ‘अमेठीमध्ये 2010 मध्ये मी शस्त्रास्र कारखान्याचं भूमिपूजन केलं होतं. गेली काही वर्षं तिथे छोट्या शस्त्रांची निर्मिती केली जाते. पण तुम्ही अमेठीला गेलात आणि सवयीप्रमाणे खोटं बोललात. तुम्हाला याबद्दल थोडीशीही लाज वाटत नाही का?’ असं राहुल गांधींनी या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

पंतप्रधान मोदींनी रविवारी राहुल गांधींचा बालेकिल्ला असलेल्या अमेठीचा दौरा केला. अमेठीमध्ये एके -२०३ या अत्याधुनिक बंदुकांचा कारखाना उभारला जाईल, असं आश्वासन त्यांनी दिलं. हा कारखाना भारत आणि रशिया एकत्रितरित्या उभारणार आहेत हेही त्यांनी सांगितलं. एवढंच नव्हे तर याबद्दल त्यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे आभारही मानले.

या बंदुकांना ‘मेड इन अमेठी’ असं म्हटलं जाईल आणि या बंदुका माओवादी आणि दहशतवाद्यांच्या विरोधात वापरल्या जातील, असं त्यांनी जाहीर केलं. पण त्यांचे हे सगळे दावे राहुल गांधींनी खोटे ठरवले आहेत.

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी मात्र राहुल गांधींच्या आरोपांना उत्तर दिलं आहे. राहुल गांधी घाबरले आहेत, तसंच अमेठीमध्ये नवे प्रकल्प आलेले त्यांना पाहावत नाहीत, असाही आरोप त्यांनी केला.

स्मृती इराणी यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींच्या विरोधात अमेठीमधून निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा पराभव झाला होता. आता पुन्हा एकदा २०१९ मध्ये राहुल गांधी विरुद्ध भाजप असा सामना रंगला आहे. ​

First published: March 4, 2019, 8:23 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading