मुख्यमंत्र्यांना एका युजरने 4 दिवसांपूर्वी दिला होता सल्ला, अगदी तसाच झाला हैदराबाद एन्काऊंटर

मुख्यमंत्र्यांना एका युजरने 4 दिवसांपूर्वी दिला होता सल्ला, अगदी तसाच झाला हैदराबाद एन्काऊंटर

तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांना एका युजरने ट्विटरवरून एन्काऊंटर करण्याचा सल्ला दिला होता. तो कशा प्रकारे करता येईल तेसुद्धा सांगितलं होतं.

  • Share this:

मुंबई, 06 डिसेंबर : सध्या देशात तेलंगणा राज्यातील हैदराबादमध्ये बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपी एन्काऊंटरमध्ये ठार झाले. गुन्हा ज्या ठिकाणी घडला तिथे तपास करण्यासाठी तसेच गुन्हा कसा केला याचे प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी आरोपींना घटनास्थळी नेण्यात आलं होतं. त्यावेळी आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. तिथं झालेल्या चकमकीत चारही आरोपी ठार झाल्याची माहिती तेलंगणा पोलिसांनी दिली. यानंतर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. नागरिक म्हणून पोलिसांनी केलेल्या एन्काऊंटरचे समर्थन एका बाजुला होत असताना कायद्यानुसार त्यांना शिक्षा व्हायला हवी होती असं म्हणत प्रश्नचिन्हही उपस्थित केलं जात आहे.

दरम्यान, तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या ट्विटवर चार दिवसांपूर्वी एका युजरने दिलेली प्रतिक्रिया व्हायरल होत आहे. यामध्ये त्या युजरने ज्या प्रमाणे सल्ला दिला होता अगदी तसाच एन्काऊंटर झाल्याने याची चर्चा सुरू आहे.

पोलिस आयुक्त व्ही. सी. सज्जनार म्हणाले की, 'आरोपींनी हा गुन्हा कसा केला आहे याविषयी विचारत असताना त्यांनी आमच्यावर हल्ला केला आणि घटनास्थळापासून पळ काढण्याचा प्रयत्न केला. आम्ही त्यांना शरण जायला सांगितलं तरीही ते थांबले नाहीत. दुसरा कोणताही पर्याय नसल्याने आम्हाला त्यांच्यावर गोळीबार करावा लागला आणि त्या सर्वांचा जागीच मृत्यू झाला.'

पोलिसांनी दिलेल्या माहितीनंतर युजरने मुख्यमंत्र्यांना दिलेल्या रिप्लायची चर्चा सुरु झाली. त्याने म्हटले होते की, आरोपींना घटनास्थळी नेऊन तिथं काय झालं ते विचारावे. तेव्हा ते पळून जायचा प्रयत्न करतील त्यावेळी गोळ्या घाला असा सल्ला युजरने दिला होता. आता संबंधित अकाउंट डिलीट कऱण्यात आलं आहे. मात्र, त्याचे स्क्रिनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

काय आहे प्रकरण?

काही दिवसांपूर्वी हैदराबादमध्ये महिला डॉक्टरवर झालेल्या सामूहिक बलात्कार आणि निर्घृण खुनाच्या बातमीने संपूर्ण देश हादरला. आरोपींना कडक शासन व्हावं यासाठी अनेक जण रस्त्यावर उतरले आहेत. आता या प्रकरणात त्या रात्री नेमकं काय घडलं हे हळूहळू समोर येत आहे.

27 नोव्हेंबर रोजी रात्री 4 नराधमांनी 25 वर्षांच्या महिला डॉक्टरवर सामूहिक बलात्कार केला आणि त्यानंतर त्यांचा खून केला. यानंतर पीडित महिला डॉक्टरांचं मृत शरीरही जाळण्यात आलं. घटनेपूर्वी आरोपींनी काय कट रचला याबद्दल पोलिसांनी माध्यमांना माहिती दिली आहे. दरम्यान, सोमवारी शवविच्छेदनानंतर महिला डॉक्टरवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेच्या अगोदर महिला डॉक्टरने शेवटच्या क्षणी तिच्या धाकट्या बहिणीशी फोनवर बोलणं केलं होतं. यात आता खळबळजनक माहिती समोर आली.

महिला डॉक्टरांच्या धाकट्या बहिणीने घटनेबद्दल माहिती देताना सांगितले की, 'दीदीने रात्री 9.20 च्या सुमारास फोन केला होता आणि सांगितले होते की तिची गाडी पंचर झाली आहे. जे लोक तिची मदत करण्यासाठी पुढे आले होते, ते संशयास्पद वाटत आहेत. मी तिला फोन बंद करू नको आणि माझ्याशी बोलत रहा असं सांगितलं. पण, फोनची बॅटरी कमी असल्यामुळे आमचा संपर्क तुटला. त्यानंतर जे काही घडलं त्याने मी हादरले आहे. हे सगळं सांगताना बहिणीला रडू आवरलं नाही तर असा घाणरडं कृत्य कोणासोबतही होऊ नये असं तिनं म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 6, 2019 01:19 PM IST

ताज्या बातम्या