टि्वटरवर #TalkToAMuslim चा एल्गार !

News18 Lokmat | Updated On: Jul 17, 2018 11:52 PM IST

टि्वटरवर #TalkToAMuslim चा एल्गार !

17 जुलै : "मी भारतीय मुस्लिम आणि मी एक व्यक्ती आहे, तुम्ही माझ्यासोबत बोलू शकतात असं म्हणत टि्वटरवर #TalkToAMuslim या हॅशटॅगची त्सुनामी आलीये. अनेक सेलिब्रिटी आणि टि्वटरकर #TalkToAMuslim हा हॅशटॅग वापरून मी मुस्लिम असून तुम्ही माझ्यासोबत बोलू शकतात असं टि्वट करताय. तर काही जण मी भारतात मुस्लिम असून स्वत:ला सुरक्षित मानतोय आणि आपले अनुभव शेअर करत आहे. काही जण हातात फलक घेऊन "मी भारतीय मुस्लिम आणि मी एक व्यक्ती आहे" असं टि्वट करत आहे.

अभिनेत्री गोहर खाननेही एक टि्वट केलंय. तिने आपल्या टि्वटरमध्ये #TalkToAMuslim हा हॅशटॅग वापरलाय. हा हॅशटॅग टि्वटवर ट्रेडिंग झालाय.

अभिनेत्री स्वरा भास्कराने हिने सुद्धा या मोहिमेला पाठिंबा दर्शवत ज्या टि्वटर युझर्सनी #TalkToAMuslim वापरून आपण मुस्लिम असल्याचे अनुभव शेअर केले आहे त्यांचे टि्वट रिटि्वट केले आहे. या आधी तिने काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचं टि्वटही रिटि्वट केलं होतं.

काही जण तर मी हिंदू आहे आणि मी मुस्लिमांसोबत बोलते कारण तीही माणसं आहे असं टि्वट केलंय.

तर काही जण हे मी भारतीय मुस्लिम आहे, मी तुमच्यासोबत शेक्सपियर, गालीब, मिराबाई यांच्यावर बोलू शकते भारताच्या स्वातंत्र्यातही मुस्लिमांचं योगदान आहे. मग माझ्यासोबत बोला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 17, 2018 11:52 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close