मराठी बातम्या /बातम्या /देश /

ट्विटर अ‌ॅक्शन मोडमध्ये; उपराष्ट्रपतींपाठोपाठ RSS च्या 'या' बड्या नेत्यांच्या हँडलवरुनही ब्लू टिक गायब

ट्विटर अ‌ॅक्शन मोडमध्ये; उपराष्ट्रपतींपाठोपाठ RSS च्या 'या' बड्या नेत्यांच्या हँडलवरुनही ब्लू टिक गायब

राष्ट्रीय स्वयंसेवर संघातील सुरेश सोनी आणि अरुण कुमार यांच्यासह इतरही वरिष्ठांच्या नावसमोरील ब्लू टीकही ट्विटनं हटवली (Twitter removed blue tick of senior RSS functionaries) आहे.

  • Published by:  Kiran Pharate

मुंबई 05 जून : मुंबई 05 जून : सरकारच्या नव्या गाइडलाइनवरून ट्विटर आणि सरकार यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद आहे. नव्या गाइडलाइन लागू करण्याबाबत ट्विटरने अद्याप काही सकारात्नमक अशी भूमिका मांडलेली नाही. अशात आता ट्विटरनं देशातील मोठमोठ्या नेत्यांच्या ट्विटर हँडलची ब्लू टिक हटवण्यास (Twitter withdraws blue tick) सुरुवात केली आहे. सुरुवातील ट्विटरनं उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या ट्विटर अकाउंटची ब्लू टिक हटवली होती. यानंतर आता राष्ट्रीय स्वयंसेवर संघातील सुरेश सोनी आणि अरुण कुमार यांच्यासह इतरही वरिष्ठांच्या नावसमोरील ब्लू टीकही ट्विटनं हटवली (Twitter removed blue tick of senior RSS functionaries) आहे.

ट्विटरच्या या मनमानी कारभारामुळे सोशल मीडियावर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. तसंच ट्विटरविरोधात कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे. शनिवारी सकाळी सुरुवातीला उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंच्या अकाउंटची ब्लू टीक हटवण्यात आली. यापाठोपाठ आता ट्विटरनं राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील दोन प्रमुख नेत्यांचे अकाउंटही अनव्हेरिफाइड केलं आहे. त्यामुळे, सोशल मीडियावर संताप व्यक्त होत आहे.

ट्विटरवरील ब्लू टिक ही एखादं अकाउंट मोठ्या किंवा प्रसिद्ध व्यक्तीचं अधिकृत अकाउंट असल्याचं दर्शवत असते. यात सरकारी कंपन्या, मोठे ब्रॅन्ड, मोठ्या संस्था, वृत्तसंस्था, पत्रकार, कलाकार, खेळाडू, सामाजिक कार्यकर्ते, नेते आणि इतर बड्या व्यक्तींचा समावेश असतो.

First published:

Tags: RSS, Twitter account