• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • Twitter कडून भारताच्या नकाशाबाबत पुन्हा घोडचूक, जम्मू-काश्मीर आणि लडाखचा वेगळे देश म्हणून उल्लेख

Twitter कडून भारताच्या नकाशाबाबत पुन्हा घोडचूक, जम्मू-काश्मीर आणि लडाखचा वेगळे देश म्हणून उल्लेख

ट्विटरनं (Twitter Map) प्रकाशित केलेल्या भारताच्या नकाशात जम्मू-काश्मीर आणि लडाख ही दोन भारतातील राज्यं म्हणजे वेगळे देश आहेत, असं दाखवलं आहे. याबाबत ट्विटरवर मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 28 जून : भारताचा नकाशा चुकीचा (Indian Map) दाखवण्याची घोडचूक ट्विटरनं (Twitter) पुन्हा एकदा केली आहे. ट्विटरनं प्रकाशित केलेल्या भारताच्या नकाशात जम्मू-काश्मीर (Jammu and Kashmir) आणि लडाख (Ladakh) ही दोन भारतातील राज्यं म्हणजे वेगळे देश (Separate countries) आहेत, असं दाखवलं आहे. भारताशेजारी असणारी दोन वेगवेगळी राष्ट्रं असा जम्मू-काश्मीर आणि लडाखचा उल्लेख ट्विटरवरील नकाशात करण्यात आला आहे. गेल्या वर्षीही केली होती चूक गेल्या वर्षी म्हणजेच 12 नोव्हेंबर 2020 या दिवशी ट्विटरनं भारताचा चुकीचा नकाशा प्रकाशित केला होता. जम्मू काश्मीर हा भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या मधील स्वतंत्र भूभाग असल्याचं ट्विटरनं नकाशात दाखवलं होतं. याप्रकरणी केंद्र सरकारकडून (Central government) ट्विटरला नोटीसही पाठवण्यात आली होती. आता तर त्याहून मोठी चूक करत जम्मू-काश्मीर आणि लडाख ही दोन्ही सीमाभागातील राज्यं म्हणजे स्वतंत्र देश असल्याचे तारे ट्विटरनं तोडले आहेत. सरकार करणार कारवाई भारत सरकारनं तयार केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान कायद्याची जाणीवपूर्वक अंमलबजावणी न केल्याबद्दल ट्विटरविरोधात सध्या केंद्र सरकार आक्रमक आहे. इतर सोशल मीडिया साईट्सना मिळणारं कायद्याचं कवच सध्या ट्विटरकडून काढून घेण्यात आलं आहे. त्यामुळे ट्विटरवर प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक आक्षेपार्ह गोष्टीसाठी कंपनीला जबाबदार धरण्यात येत आहे. अशात ट्विटरनं नकाशाबाबत घोडचूक केल्यामुळं केंद्र सरकार याविरोधात अधिकच आक्रमक होण्याची चिन्हं आहेत. हे वाचा - Swiggyनं पनीर ऐवजी पाठवला चिकन रोल;Vegतरुणाला नॉनव्हेज खाऊ घातल्यानं धर्म भ्रष्ट अशी होऊ शकते कारवाई केंद्र सरकारकडून लवकरच ट्विटरला नोटीस पाठवली जाण्याची शक्यता आहे. नोटिशीत देण्यात येणाऱ्या मुदतीत ट्विटरनं जर नकाशात सुधारणा केली नाही, तर ट्विटरवर कायदेशीर कारवाईला सुरुवात होऊ शकते. माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम 69 नुसार ट्विटरवर अनेक निर्बंध लादण्यात येऊ शकतात. त्याचप्रमाणं ट्विटरविरुद्ध गुन्हा दाखल करून जबाबदार अधिकाऱ्यांना तुरुंगवासाची शिक्षादेखील होऊ शकते.
  Published by:desk news
  First published: