Twitter झालं डाऊन, ‘टिवटिव’ बंद झाल्याने नेटकरी वैतागले

Twitter झालं डाऊन, ‘टिवटिव’ बंद झाल्याने नेटकरी वैतागले

फक्त भारतातच नाही तर इंडोनेशिया, मलेशिया आणि इतर काही देशांमध्येही Twitter डाऊन झाल्याची माहिती आहे

  • Share this:

नवी दिल्ली 28 ऑक्टोबर: सोशल मीडियामध्ये सर्वात जास्त प्रभावी माध्यम असलेलं Twitter बुधवारी रात्री पुन्हा एकदा डाऊन झालं. रात्री 8.30च्या दरम्यान अचानक लोकांचे Twitte जात नव्हते तर अनेकांना आपडेट दिसत नव्हते. त्यामुळे नेमकं काय झालं हे कुणालाच कळत नव्हतं. नंतर Twitter डाऊन झाल्याची माहिती पुढे आली.

फक्त भारतातच नाही तर इंडोनेशिया, मलेशिया आणि इतर काही देशांमध्येही Twitter डाऊन झाल्याची माहिती आहे. गेल्या काही दिवसांमध्ये तिसऱ्यांचा हा प्रकार घडला आहे. माहिती मिळवण्यासाठी आणि विचार मांडण्यासाठी Twitter हे सर्वात प्रभावी माध्यम असल्याने ट्विटरवर प्रत्येकं सेंकदाला हजारो ट्विट येत असतात.

ट्विटर हे माहिती मिळवण्याचं आणि व्यक्त होण्याचं पहिलं साधन झालं आहे. त्यामुळे ते बंद असणं म्हणजे नेटकऱ्यांना त्रासाचं असतं. या माध्यमांची प्रचंड सवय असल्याने

महिनाभरात तिसऱ्यांदा ट्विटर डाउन झालं आहे. कॉम्प्युटर तसेच अॅड्राईड आणि IOS ऑपरेटिंग सिस्टमवरही ट्विटर अपडेट होत नसल्याच्या तक्रारी आल्या आहेत.

दरम्यान, काही वेळानंतर ट्विटर पुन्हा व्यवस्थित सुरू झालं. त्यामुळे नेटकऱ्यांनी सुटकेला निश्वास सोडला.

Published by: Ajay Kautikwar
First published: October 28, 2020, 9:32 PM IST
Tags:

ताज्या बातम्या