Twitter ने मागितली भारताची माफी, लडाखला चीनचा भाग दाखवणं पडलं महागात

Twitter ने मागितली भारताची माफी, लडाखला चीनचा भाग दाखवणं पडलं महागात

या आधी टविटरकडून समितीला पत्र मिळालं होतं. मात्र असं पत्र हे पुरेसं नसून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून आपली भूमिका स्पष्ट करावी असं समितीने म्हटलं होतं.

  • Share this:

नवी दिल्ली 18 नोव्हेंबर: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या ट्विटर (Twitter) ने लडाखला चीनचा भाग दाखविल्याची चूक मान्य केली आहे. डेटा सुरक्षेसंबंधिच्या विधेयकावर स्थापन केलेल्या समितीच्या अध्यक्षा मीनाक्षी लेखी यांनी ही माहिती दिली. यासंबंधात ट्विटरचे ज्येष्ठ अधिकारी डॅमियन कॅरियन यांचं एक पत्र समितीला मिळालं असून त्यात त्यांनी चूक झाल्याबद्दल माफी मागितली असून 30 नोव्हेंबरपर्यंत ही चूक दुरुस्त करण्याचं मान्य केलं असल्याची माहितीही लेखी यांनी दिली आहे. या आधी टविटरकडून समितीला पत्र मिळालं होतं. मात्र असं पत्र हे पुरेसं नसून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून आपली भूमिका स्पष्ट करावी असं समितीने म्हटलं होतं.

भारताचा चुकीचा नकाशा दाखविल्याबद्दल तुमच्यावर कायदेशीर कारवाई का करण्यात येऊ नये असं केंद्रानेही ट्विटरला बजावलं होतं. त्याचबरोबर 5 दिवसांमध्ये उत्तर द्या असंही सांगितलं आहे.

या आधीही ट्विटर इंडिया (Twitter India) ने जम्‍मू-कश्‍मीर (Jammu Kashmir) ला चीनचा (China) भाग असल्याचं दाखवलं होतं. एका ट्विटर यूजरने लोकेशन टॅग केल्यावर (Geo Tag) जम्मू काश्मीर, रिपब्लिक ऑफ चायना, असं आलं. यावरून इंटरनेटवर यूजर्स प्रचंड भडकले होते. तातडीने हे उद्योग करणाऱ्यांना अटक करण्याची मागणी करण्यात आली होती. एवढंच नाही तर Twitter वर बंदी (Twitter Ban) आणा, अशीही मागणी झाली होती.

अशा प्रकारे जम्मू काश्मीरला चीनमध्ये दाखवत असल्याचं प्रथम लक्षात आलं ते ऑब्झर्वर रिसर्च फाउंडेशनच्या कांचन गुप्ता यांनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर. कांचन गुप्ता यांनी Tweet करून याबद्दल नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं. 'ट्विटरने आता भूगोल बदलण्याचा निर्णय घेतलेला दिसतो. जम्मू काश्मीरला त्यांनी चीनचा भाग म्हणून घोषित केलं आहे.

हे भारतीय कायद्याचं उल्लंघन नाही तर काय आहे? अमेरिकन कंपनी कायद्यापेक्षा मोठी आहे काय?' या त्यांच्या Tweet ने खळबळ उडाली होती. नंतर ट्विटरने ती तांत्रिक चूक असल्याचं म्हणत योग्य नकाशा दाखवला होता. आता ट्विटर काय उत्तर देतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: November 18, 2020, 8:34 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading